June 17, 2026

कोटकने आणला नवीन फंड! फक्त ₹५०० पासून SIP सुरू, जबरदस्त रिटर्नची संधी

0
Kotak Active Momentum Fund

Kotak Active Momentum Fund

Kotak Active Momentum Fund : गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी आहे. कोटक महिंद्रा अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड (Kotak Mahindra AMC) ने आपल्या म्युच्युअल फंडांच्या यशस्वी मालिकेत आणखी एक नावीन्यपूर्ण योजना सादर केली आहे — ‘कोटक अ‍ॅक्टिव्ह मोमेंटम फंड’. ही योजना २९ जुलै २०२५ पासून १२ ऑगस्ट २०२५ पर्यंत नव्या गुंतवणुकीसाठी (NFO – न्यू फंड ऑफर) खुली असणार आहे.

हे पण वाचा : सुझलॉन शेअरचे ताजं लक्ष्य जाहीर! तज्ज्ञांच्या मते आता ‘हा’ स्टॉक BUY करण्यास योग्य

कोटकचा हा फंड ‘मोमेंटम इन्व्हेस्टिंग’ या संकल्पनेवर आधारित आहे. थोडक्यात सांगायचं तर, ज्या कंपन्यांचे उत्पन्न वेगाने वाढतेय, जे शेअर्स सतत वर जात आहेत आणि ज्यांना तज्ञांकडून सकारात्मक रेटिंग मिळालं आहे, अशा कंपन्यांमध्ये या फंडाद्वारे गुंतवणूक केली जाणार आहे.

या योजनेचा खास भाग म्हणजे त्यामागे असलेलं डेटा सायन्सवर आधारित स्मार्ट मॉडेल. हे मॉडेल केवळ शेअर्सच्या किमतीच नाही, तर त्या कंपन्यांच्या विक्रीत झालेली वाढ, त्यांचे तिमाही निकाल, प्रति शेअर कमाई (EPS) आणि तज्ञांकडून मिळालेल्या मतांचाही विचार करते. म्हणजेच, हा फंड तात्कालिक बाजारभावावर नाही, तर कंपनीच्या ठोस आर्थिक स्थितीवर आधारित निर्णय घेतो.

कोटकचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश शाह यांनी स्पष्ट केलं की, “बाजार शेवटी कमाईकडेच पाहतो. जे शेअर्स मजबूत आर्थिक कामगिरी करत असतात, ते तेजी आणि मंदीच्या काळातही टिकून राहतात. आमचं मॉडेल अशाच कंपन्यांची निवड करतं.”

या फंडाचा पोर्टफोलिओ तयार करताना बाजार भांडवलानुसार टॉप २५० शेअर्सपैकी ४० ते ५० सर्वोत्तम शेअर्स निवडले जातील. कमकुवत कामगिरी करणारे शेअर्स काढून टाकले जातील आणि पोर्टफोलिओ नियमितपणे पुनरावलोकन करून अद्ययावत केला जाईल.

हे पण वाचा : गुंतवणूकदारांसाठी संधी! JP Power शेअरवर तज्ज्ञांचं नवीन टार्गेट जाहीर

फंड मॅनेजर रोहित टंडन म्हणाले, “आम्ही डेटा सायन्स आणि गुंतवणूक तत्त्वज्ञान यांचं संयोग करून हा फंड तयार केला आहे. या फंडामध्ये अशा कंपन्यांवर भर आहे ज्या सतत आर्थिकदृष्ट्या सुधारत आहेत आणि ज्यांना मार्केटमधील विश्लेषकांचा पाठिंबा आहे.”

गुंतवणूक सुरू करण्यासाठी फार मोठी रक्कमही लागणार नाही. एकरकमी गुंतवणुकीसाठी किमान ₹5,000 आणि SIP साठी फक्त ₹500 पासून सुरुवात करता येते. त्यामुळे नवशिक्या गुंतवणूकदारांपासून ते अनुभवी गुंतवणूकदारांपर्यंत सगळ्यांसाठी हा फंड एक चांगला पर्याय ठरू शकतो.

Leave a Reply

Discover more from Punelive24

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading