टाटा पॉवर शेअर्समध्ये 38% कमाईची संधी, गुंतवणूकदारांनी तयार राहा
Tata Power Stock
Tata Power Stock : शेअर बाजारात पुन्हा एकदा उसळी घेतल्याचं चित्र आज दिसलं आणि या सकारात्मक वातावरणात टाटा पॉवरचा शेअर गुंतवणूकदारांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. बुधवारी, 23 जुलै 2025 रोजी बाजार सुरु होताच टाटा पॉवरचा शेअर जोरात वधारला. अनेक ब्रोकिंग फर्म्स आणि तज्ज्ञांनी या शेअरबाबत आशादायक मत व्यक्त करत, येत्या काही महिन्यांत जवळपास ३८.८९ टक्के अपसाईड रिटर्न मिळू शकतो, असा विश्वास व्यक्त केला आहे.
हे पण वाचा : ब्रोकिंग फर्मचा जिओ फायनान्शिअलवर विश्वास, टार्गेट प्राइस ऐकून थक्क व्हाल!
आज बीएसई सेन्सेक्स तब्बल ३९५.७५ अंकांनी वधारून ८२५८२.५६ वर पोहोचला, तर निफ्टी १०७.०५ अंकांनी वाढून २५१६७.९५ वर स्थिरावला. यात टाटा पॉवरसारख्या मजबूत कंपन्यांनी मोठा वाटा उचलला. आजच टाटा पॉवरचा शेअर ४०३.२० रुपये या दराने ट्रेड झाला आणि ४०५ रुपयांपर्यंतचा उच्चांक गाठला.
टाटा पॉवरची सध्याची आर्थिक घडी, पर्यावरणपूरक ऊर्जा प्रकल्पांत सातत्याने होणारी गुंतवणूक आणि वाढती महसूल क्षमता पाहता, बाजारातील तज्ज्ञ या शेअरला दीर्घकालीन दृष्टिकोनातून अत्यंत फायदेशीर मानत आहेत. कंपनीने अलीकडेच अक्षय ऊर्जा प्रकल्प, ईव्ही चार्जिंग नेटवर्क आणि ग्रिड सुधारणा योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. त्यामुळे कंपनीच्या महसूलात आणि नफ्यात सातत्याने वाढ होत आहे.
सध्या टाटा पॉवरचा शेअर ४९४.८५ रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीपासून थोडकाच खाली आहे, तर नीचांकी पातळी ३२६.३५ रुपये आहे. म्हणजेच, अजूनही गुंतवणूकदारांना या शेअरमध्ये चांगली संधी मिळू शकते. कंपनीचं एकूण मार्केट कॅप सध्या १.२८ लाख कोटी रुपये इतकं भक्कम आहे, जे तिच्या स्थिरतेचं आणि विश्वासार्हतेचं निदर्शक आहे.
हे पण वाचा : टाटा टेक शेअर खरेदीची योग्य वेळ? जाणून घ्या टार्गेट प्राइस आणि रेंज
देशात वीजवाटप क्षेत्रातील तांत्रिक सुधारणा, हरित ऊर्जा धोरणांना मिळत असलेली सरकारी पाठबळ आणि भविष्यातील ईलेक्ट्रिक वाहन क्रांतीसाठी लागणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चरमधील टाटा पॉवरची भूमिका ही फारच निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे अनेक ब्रोकिंग हाऊसेस या शेअरला लाँग टर्म ‘बाय’ कॉल देत आहेत.
