सोन्याच्या दरात मोठी घसरण! आज 10 जुलैला 22 आणि 24 कॅरेटचे भाव किती आहेत? वाचा एका क्लिकवर
Gold Price Today
Gold Price Today : गेल्या काही आठवड्यांपासून चढ-उताराच्या झुल्यावर झुलणाऱ्या सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा मोठी घसरण झाली आहे. सोनं खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी ही बातमी महत्त्वाची ठरणार आहे. कारण २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा दर आज जवळपास ९८ हजार रुपयांपर्यंत खाली आला आहे. जून महिन्यात १ लाख रुपयांच्या पातळीवर असलेले दर आता घटून ग्राहकांना दिलासा देत आहेत.
हे पण वाचा : आज तुमच्या राशीला लाभ होणार का? जाणून घ्या 10 जुलैचं संपूर्ण राशीभविष्य
गेल्या महिन्यात २४ कॅरेट सोन्याचा दर काही काळासाठी १ लाखाच्या वर पोहोचला होता. २३ जूनच्या सुमारास अनेक शहरांमध्ये सोनं १ लाख २०० ते १ लाख ४०० रुपयांदरम्यान विकले जात होते. मात्र त्यानंतरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात घसरण झाली. जुलै महिन्याच्या सुरुवातीस किंमती थोड्याशा वाढल्या, पण त्या काही दिवसांपुरत्याच राहिल्या. आता पुन्हा घसरणीचा कल स्पष्टपणे दिसून येतो आहे.
आज म्हणजेच १० जुलै २०२५ रोजी मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, ठाणे, नाशिक, लातूर, जळगाव, भिवंडी आणि वसई-विरारसह बहुतांश प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या दरात कमालीची घट झाली आहे. मुंबईत २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा दर आज ९८,१७० रुपये प्रति १० ग्रॅम इतका नोंदवण्यात आला आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा दर ८९,९९० रुपये आणि १८ कॅरेटसाठी ७३,६३० रुपये इतका आहे.
पुण्यातही हेच दर लागू असून, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगाव, आणि इतर शहरांतही किंमती जवळपास सारख्या आहेत. मात्र नाशिक, लातूर, वसई-विरार आणि भिवंडी येथे किंमती थोड्या जास्त म्हणजे २४ कॅरेटसाठी ९८,२०० रुपये, २२ कॅरेटसाठी ९०,०२० रुपये आणि १८ कॅरेटसाठी ७३,६६० रुपये प्रति १० ग्रॅम इतक्या आहेत.
हे पण वाचा : पालकांनो सावधान! पावसाळ्यात लहान मुलं आजारी पडतायत, ‘हे’ उपाय आता लगेच करा
ही घसरण का झाली, याविषयी बाजार तज्ज्ञांचे मत आहे की, आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरची स्थिती, व्याजदरांबाबतचे संकेत आणि गुंतवणूकदारांची भावनाच सोन्याच्या किमती ठरवत असतात. सध्या जागतिक अर्थव्यवस्थेतील अनिश्चितता, आणि अमेरिका-चीनमधील व्यापार तणाव यामुळे सोन्याच्या दरात अस्थिरता कायम आहे.
