October 30, 2026

दुबईहून विना टॅक्स भारतात किती सोनं आणता येतं ? जाणून घ्या काय आहेत महत्वाचे नियम

0
Pune Live24 (10)

Gold Import Rules India | सध्या भारतात सोन्याचे दर झपाट्याने वाढत आहेत. दिल्लीसह इतर मोठ्या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम सुमारे 93,000 रुपये झाली आहे. अशा वेळी दुबईहून सोनं आणणं स्वस्त वाटतं, कारण तेथे 24 कॅरेट सोन्याचा भाव सुमारे 85,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

म्हणजेच भारताच्या तुलनेत दुबईत सोनं 8-9 टक्क्यांनी स्वस्त आहे. पण खरंच दुबईवरून सोनं आणणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल का? यासाठी तुम्हाला भारत सरकारचे कस्टम नियम आणि मर्यादा समजून घेणे आवश्यक आहे.

दुबईहून सोनं आणणं बेकायदेशीर नाही. मात्र, ते नियमांनुसार आणले नाही तर मोठा दंड भरावा लागतो आणि तुमचं ‘स्वस्त’ सोनं महागात पडू शकतं. भारतात परतताना कस्टम विभागाला सर्व वस्तूंची माहिती द्यावी लागते, ज्यामध्ये सोन्याचाही समावेश असतो.

काय आहेत नियम ?

पुरुष प्रवाशांना 20 ग्रॅमपर्यंत (म्हणजे अंदाजे 50,000 रुपयांपर्यंत) आणि महिलांना 40 ग्रॅमपर्यंत (जास्तीत जास्त 1,00,000 रुपये किंमतीपर्यंत) सोनं विना कस्टम ड्युटी भारतात आणण्याची परवानगी आहे.

15 वर्षांखालील मुलांनाही 40 ग्रॅमपर्यंत विना ड्युटी दागिने आणता येतात. मात्र, यासाठी प्रवाशाने परदेशात किमान 6 महिने वास्तव केलेलं असावं लागतो. तसेच, तुम्ही जे सोनं घेऊन येता ते अधिकृतरीत्या विकत घेतलेलं आणि इनवॉईससह असावं लागतं.

कस्टम ड्युटी किती

जर तुम्ही या मर्यादेपेक्षा जास्त सोनं घेऊन आलात, तर त्यावर कस्टम ड्युटी आकारली जाते. 50 ग्रॅमपर्यंत 3 टक्के, 50 ते 100 ग्रॅमपर्यंत 6 टक्के आणि 100 ग्रॅमपेक्षा जास्त सोन्यावर 10 टक्क्यांपर्यंत कस्टम ड्युटी भरावी लागते.

यामध्ये सेस आणि GST समाविष्ट असतो, त्यामुळे एकूण ड्युटीचा भार 9 टक्क्यांपर्यंत पोहोचतो, त्यामुळे दुबईहून सोनं आणताना त्याची गणितं नीट समजून घ्या. नियम पाळले तर तुम्ही फायदेशीर सौदा करू शकता, अन्यथा ‘स्वस्त सोनं’ महागात पडू शकतं.

Leave a Reply