सोन्याच्या दरात एकाच दिवसात उसळी! पुण्यात १० ग्रॅमची किंमत किती झाली? वाचा सविस्तर
Gold Price Today
Gold Price Today : भारतीय सराफा बाजारात आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरात झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून किंमती स्थिर होण्याच्या चिन्हांकडे बघत असतानाच आज सोनं पुन्हा महागलं असून ग्राहकांच्या खिशाला चांगलीच झळ बसणार आहे. विशेषतः मुंबई आणि पुण्यासारख्या प्रमुख शहरांमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर तब्बल ९९,५३० रुपये प्रति १० ग्रॅम पर्यंत पोहोचला आहे.
हे पण वाचा : आज पडणार मुसळधार पाऊस! ‘या’ भागांत हवामान विभागाने दिला सतर्कतेचा इशारा
ही वाढ अचानक का झाली, यामागे आंतरराष्ट्रीय बाजारात झालेला बदल, डॉलरच्या तुलनेत रुपयातील घसरण, तसेच गुंतवणूकदारांकडून पुन्हा सोन्याकडे वळणं हे महत्त्वाचे घटक मानले जात आहेत.
सराफा बाजारात सोनं परंपरेने सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिलं जातं. त्यामुळे प्रत्येक घसरणीनंतर सोन्यात गुंतवणूक वाढते आणि परिणामी किंमती पुन्हा चढतात. आजदेखील बाजारात असाच उलटफेर पाहायला मिळाला.
बुलियन मार्केटनुसार, आजचा २४ कॅरेट सोन्याचा दर देशभरात ९९,७१० रुपये प्रति १० ग्रॅम असून २२ कॅरेट सोनं ९१,४०१ रुपये प्रति १० ग्रॅम दराने विकलं जात आहे.
मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिक यासारख्या शहरांमध्ये दर जवळपास सारखेच असून २२ कॅरेटसाठी ९१,२३६ रुपये, तर २४ कॅरेटसाठी ९९,५३० रुपये प्रति १० ग्रॅम एवढा भाव नोंदवण्यात आला आहे. फक्त सोनंच नव्हे तर चांदीसुद्धा आज महागली आहे. १ किलो चांदीचा दर ११४,८२० रुपये इतका झाला असून १० ग्रॅमसाठी १,१४८ रुपये दर आहे.
हे दर शहरानुसार किंचित बदलू शकतात. यामध्ये स्थानिक उत्पादन शुल्क, राज्यस्तरीय कर व मेकिंग चार्जेस यांचा समावेश असल्यामुळे प्रत्यक्ष दागिन्यांच्या किंमती आणखी वाढू शकतात.
हे पण वाचा : नोकरीत बढती, हवं तिथं पोस्टिंग! आज ‘या’ राशीवर ग्रहांची विशेष कृपा
आकड्यांवर नजर टाकल्यास, एक गोष्ट स्पष्ट होते – येत्या सणासुदीच्या काळात दागिने घेण्याचा विचार करत असाल, तर आताच नियोजन करून खरेदी करणं तुमच्या फायद्याचं ठरू शकतं. कारण, दर जसे वाढत आहेत, तसंच सोनं सामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर जात आहे.
