November 1, 2026

गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! जिओ फायनान्शिअलवर ब्रोकिंग फर्मचा पॉझिटिव्ह रेटिंग

0
Jio Financial Services Share Price

Jio Financial Services Share Price

Jio Financial Services Share Price : भारतीय शेअर बाजारात गुरुवारी मोठी घसरण दिसून आली असतानाच, जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीच्या शेअरने मात्र बाजारपेठेला चकित केले आहे. सेन्सेक्स तब्बल ४२२ अंकांनी खाली घसरला असतानाही जिओ फायनान्शिअलच्या शेअरमध्ये तेजी नोंदवली गेली. आज दिवसभरात हा शेअर ३१३.४५ रुपयांपासून ३१९.४० रुपयांपर्यंतच्या रेंजमध्ये ट्रेड झाला.

हे पण वाचा : रेल्वे क्षेत्रातील शेअरमध्ये जोश! RVNL वर 626 रुपये टार्गेट, गुंतवणूकदारांनी तयार राहा

बाजारात नकारात्मक वातावरण असतानाही जिओ फायनान्शिअलच्या शेअरने सुमारे ०.८०% वाढ नोंदवत ३१७ रुपयांवर स्थिरता दर्शवली. सकाळी ट्रेडिंग सुरू होताच हा शेअर ३१५ रुपयांवर उघडला होता. त्यामुळे गुंतवणूकदारांचं लक्ष या स्टॉककडे वळले आहे.

दरम्यान, चॉइस ब्रोकिंग या नामवंत ब्रोकरेज फर्मने या स्टॉकबाबत ‘बुलिश’ दृष्टिकोन व्यक्त केला आहे. त्यांनी जिओ फायनान्शिअल शेअरवर सकारात्मक मत नोंदवत टार्गेट प्राईस जाहीर केलं आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये नव्याने उत्साह संचारला आहे. या टार्गेटमुळे बाजारातील दिग्गज गुंतवणूकदारांनी या शेअरकडे पुन्हा नजर वळवली आहे.

जिओ फायनान्शिअलचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ३६३ रुपये असून, नीचांकी स्तर १९८.६५ रुपये इतका होता. सध्या कंपनीचं एकूण मार्केट कॅप २,०१,६८५ कोटी रुपये इतकं आहे. अल्पकालीन व्यापार करत असलेल्या ट्रेडर्ससाठी आणि दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी ही एक संधी मानली जात आहे.

भारतीय शेअर बाजारात आज निफ्टी -११९.६० अंकांनी घसरून २५,१००.३० वर, तर सेन्सेक्स -४२२.५५ अंकांनी खाली येत ८२,३०४.०९ वर बंद झाला. तसंच आयटी आणि स्मॉलकॅप निर्देशांकांमध्येही मोठ्या प्रमाणात घसरण दिसून आली. मात्र अशा बिकट स्थितीत जिओ फायनान्शिअलचा स्थिर आणि सकारात्मक कल हा गुंतवणूकदारांना आश्वस्त करणारा ठरतोय.

हे पण वाचा : इन्फोसिसचा शेअर पडला पण संधी वाढली, नवा टार्गेट प्राईस गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर!

विश्लेषकांच्या मते, जिओ फायनान्शिअलचा व्यवसाय मॉडेल, मजबूत बॅलन्स शीट, आणि रिलायन्स समूहाची पार्श्वभूमी हे घटक गुंतवणूकासाठी आत्मविश्वास देणारे ठरत आहेत. भविष्यातील वित्तीय क्षेत्रातील विस्तार आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरील उपस्थितीमुळेही या शेअरमध्ये दमदार वाढ होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply