शेअरधारकांसाठी आनंदवार्ता! २ शेअर्सवर १ मोफत; Shilchar Technologies देणार बोनस व डिव्हिडंड
Shilchar Technologies Share
Shilchar Technologies Share : शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी एक मोठी आनंदवार्ता आहे. वीज ट्रान्सफॉर्मर उत्पादक असलेल्या शिलचर टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीने आपल्या भागधारकांसाठी बोनस शेअर्स आणि लाभांश या दुहेरी फायद्याची घोषणा केली आहे. या निर्णयाला औपचारिक मंजुरी मिळावी यासाठी १२ ऑगस्ट २०२५ रोजी ३९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (Annual General Meeting – AGM) आयोजित करण्यात आली आहे.
हे पण वाचा : टाटा टेक शेअर 745 वर पोहोचला! आता गुंतवणूकदारांनी काय करावे – Hold की Exit?
कंपनीने आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी प्रति शेअर ₹१२.५ चा अंतिम लाभांश जाहीर केला असून, यासोबतच प्रत्येक २ शेअर्समागे १ बोनस शेअर देण्याचाही निर्णय घेतला आहे. गुंतवणूकदारांसाठी ही बातमी केवळ आर्थिक फायदा देणारी नसून कंपनीच्या स्थैर्याचा आणि वाढीचा स्पष्ट संकेतही आहे.
शेअर्स मिळवण्यासाठी आणि मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी काही महत्त्वाच्या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. लाभांश आणि बोनससाठी पात्र गुंतवणूकदारांची यादी ८ ऑगस्ट २०२५ रोजी निश्चित केली जाणार आहे. तर, AGM मध्ये भाग घेऊन मतदान करण्यासाठी १ ऑगस्टपर्यंत सदस्यत्व असणे आवश्यक आहे. रिमोट ई-व्होटिंग ९ ऑगस्टपासून सुरू होऊन ११ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५ वाजता संपेल.
कंपनीच्या कामगिरीचा विचार केला, तर आर्थिक वर्ष २५ मध्ये शिलचर टेक्नॉलॉजीजने उत्तम यश मिळवले आहे. कंपनीचा महसूल ३९७ कोटींवरून थेट ६२३ कोटी रुपयांवर पोहोचला. करानंतरचा निव्वळ नफा (PAT) ६०% वाढ होऊन १४७ कोटींवर गेला आहे. EBITDA मार्जिनही ३०% वर स्थिर आहे, जे या उद्योगासाठी उत्कृष्ट मानले जाते.
ऑगस्ट २०२४ मध्ये कंपनीने ३,५०० एमव्हीए क्षमतेचा विस्तार पूर्ण करून आपली स्थापित क्षमता ७,५०० एमव्हीएपर्यंत वाढवली. उत्पादन क्षमतेचा वापरही ७७ टक्क्यांपर्यंत गेला असून, यामुळे उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे.
हे पण वाचा : 1136% परतावा देणाऱ्या शेअरचा जोरदार कमबॅक! पुन्हा बनतोय गुंतवणुकीचा बादशहा
१९८६ साली स्थापन झालेली ही कंपनी अक्षय ऊर्जा व औद्योगिक क्षेत्रासाठी सानुकूल ट्रान्सफॉर्मर बनवण्यात माहिर आहे. १७ एकरमध्ये पसरलेल्या उत्पादन केंद्रातून २५ हून अधिक देशांमध्ये निर्यात केली जाते. या वर्षी कंपनीच्या एकूण महसुलापैकी तब्बल ४३% महसूल फक्त निर्यातीमधून आला आहे. अमेरिका, युरोप, आफ्रिका, मध्यपूर्व आणि आशिया हे त्यांचे प्रमुख बाजार आहेत.
