‘बुलेट’सारखा सुरुवातीचा वेग, पण आता ‘या’ शेअरमध्ये 40% घसरण? ब्रोकर्स देतायत विक्रीचा इशारा!
Tata Technologie share
Tata Technologies stock : टाटा समूहाचा एकेकाळी तुफान गतीने धावणारा शेअर – टाटा टेक्नोलॉजीज – सध्या गुंतवणूकदारांच्या चिंतेचं कारण ठरत आहे. काही महिन्यांपूर्वी शेअर बाजारात धडाक्यात एन्ट्री करणाऱ्या या कंपनीच्या शेअरने सुरुवातीला गुंतवणूकदारांना भरघोस नफा दिला. मात्र सध्या मात्र परिस्थिती वेगळी आहे. शेअरचा गतीमान प्रवास अचानक थांबला असून, आता या शेअरबाबत सावधगिरीचा इशारा दिला जात आहे. काही ब्रोकरेज संस्थांनी तर थेट ‘विक्री करा’ असं थेट मत नोंदवलं आहे.
हे पण वाचा : लाभांश मिळवायचा आहे? आज शेअर्स खरेदीची शेवटची संधी! 47 कंपन्यांची मोठी यादी
जून तिमाहीचे निकाल समोर आल्यानंतर गुंतवणूकदारांचा आणि ब्रोकरेज संस्थांचा या शेअरवरील विश्वास डळमळीत झाला आहे. कंपनीचा महसूल चांगला असला तरी नफ्याच्या टक्केवारीत अपेक्षित कामगिरी झाली नाही. म्हणजेच खर्च वाढला, उत्पन्नही वाढलं, पण शेवटी हाती पडलेला नफा अपेक्षेपेक्षा कमी. यामुळे या शेअरमध्ये घसरण सुरु झाली आहे आणि ती अजून थांबेल की नाही, हे स्पष्ट नाही.
जगप्रसिद्ध ब्रोकरेज कंपन्यांनी टाटा टेकच्या भविष्यावर शंका व्यक्त करत ‘SELL’ रेटिंग दिलं आहे. जेपी मॉर्गन, गोल्डमन सॅक्स, सिटी ग्रुप आणि आयसीआयसीआय सिक्युरिटीज यांनी या स्टॉकमधील घसरण अजून सुरूच राहण्याचा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे १७ पैकी तब्बल १२ विश्लेषकांनी ‘विक्री करा’ असं मत नोंदवलं असून, काहींच्या मते या स्टॉकमध्ये येत्या काळात ४०% पर्यंत घसरण होऊ शकते.
जेपी मॉर्गनने या स्टॉकसाठी ५७० रुपयांचं टार्गेट दिलं आहे, तर गोल्डमन सॅक्सने हे लक्ष्य थेट ५६० रुपयांवर आणलं आहे. सध्याचा शेअर भाव लक्षात घेतल्यास हे टार्गेट गाठण्यासाठी मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. कंपनीकडून जरी आगामी तिमाहीत काही सुधारणा होण्याची चिन्हं असली, तरी ब्रोकरेज संस्थांच्या मतानुसार गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे.
हे पण वाचा : सुझलॉन शेअरबाबत मोठा ब्रोकिंग अलर्ट! संयम ठेवणाऱ्यांना होणार जबर नफा?
ज्यांनी टाटा टेकमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक केली आहे, त्यांनी कंपनीच्या मूलभूत आर्थिक स्थितीकडे पाहिलं पाहिजे. पण ज्या गुंतवणूकदारांनी अल्पकालीन नफा कमावण्याच्या उद्देशाने खरेदी केली असेल, त्यांच्यासाठी सध्याचा इशारा महत्त्वाचा ठरू शकतो. शेअर बाजारातील चढ-उतार हे नित्याचेच असले तरी योग्य वेळी योग्य निर्णय घेणं, हाच शहाणपणाचा मार्ग असतो.
