‘या’ कंपन्या देणार करोडोंचा लाभांश! शेवटची खरेदी संधी गमावू नका; वाचा सविस्तर
Dividend Paying Stocks 2025
Dividend Paying Stocks 2025 : गुंतवणूकदारांसाठी चालू आठवडा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. शेअर बाजारात अनेक कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर लाभांश जाहीर केले असून काही कंपन्यांचा डिव्हिडंड ५०० रुपयांच्या पुढे गेला आहे. या लाभांशाचा फायदा घेण्यासाठी गुंतवणूकदारांना रेकॉर्ड तारखेपूर्वी संबंधित शेअर्स त्यांच्या डिमॅट खात्यात ठेवावे लागतील. कारण एक्स-डिव्हिडंड तारखेनंतर खरेदी केलेल्या शेअर्सवर डिव्हिडंड मिळणार नाही.
हे पण वाचा : ‘या’ पॉवर स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत, 52 आठवड्यांचा रेकॉर्ड ब्रेक
सोमवार २८ जुलैपासून अनेक कंपन्यांचे शेअर्स एक्स-डिव्हिडंडमध्ये ट्रेडिंगसाठी उपलब्ध झाले आहेत. कॉस्मो फर्स्टने ४ रुपये, क्रिसिलने ९ रुपये, डीएलएफने ६ रुपये, केपीआयटी टेकने ६ रुपये आणि विप्रोने ५ रुपयांचा डिव्हिडंड जाहीर केला आहे. त्यामुळे या कंपन्यांचे शेअर्स २८ जुलैपासून एक्स-डिव्हिडंड झाले आहेत.
याच आठवड्यात सर्वाधिक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेली कंपनी म्हणजे बॉश लिमिटेड. या बहुराष्ट्रीय ऑटो कंपोनंट कंपनीने तब्बल ५१२ रुपये प्रति शेअर इतका लाभांश जाहीर करत गुंतवणूकदारांना मोठा झटका दिला आहे. बॉशसाठी रेकॉर्ड तारीख मंगळवार २९ जुलै निश्चित करण्यात आली असून, त्यापूर्वी शेअर्स खरेदी करणाऱ्यांनाच हा डिव्हिडंड मिळणार आहे.
बॉश व्यतिरिक्त अपार इंडस्ट्रीजने ५१ रुपये, अलेम्बिक फार्माने ११ रुपये आणि राणे होल्डिंग्जने ३८ रुपयांचा अंतिम लाभांश जाहीर केला आहे. यांचे शेअर्सही २९ जुलै रोजी एक्स-डिव्हिडंड होतील.
हे पण वाचा : IREDA शेअर सतत घसरतोय, पण अनुभवी गुंतवणूकदारांसाठी ही आहे सोन्याची संधी!
हॉकिन्स कुकरने ३० जुलैला प्रति शेअर १३० रुपयांचा डिव्हिडंड जाहीर केला असून त्याची रेकॉर्ड तारीख बुधवार, ३० जुलै आहे. यानंतर गुरुवारी ३१ जुलै रोजी बीपीसीएल (५ रुपये), कोफोर्ज (४ रुपये), टीटीके प्रेस्टीज (६ रुपये) आणि युनायटेड ब्रुअरीज (१० रुपये) या कंपन्यांचे शेअर्स एक्स-डिव्हिडंडमध्ये जातील.
शुक्रवारी १ ऑगस्टलाही काही महत्त्वाच्या कंपन्यांच्या लाभांश रेकॉर्ड तारखा आहेत. बालाजी अमाइन्सने ११ रुपये, बाटा इंडियाने ९ रुपये आणि डेटा पॅटर्न्सने ७.९ रुपये लाभांश जाहीर केला आहे. त्याचबरोबर आयशर मोटर्सने ७० रुपये आणि मारुती सुझुकी इंडियाने १३५ रुपयांचा डिव्हिडंड जाहीर केला असून यांची रेकॉर्ड तारीखही १ ऑगस्ट आहे.
