फक्त 7 दिवसात 46% परतावा! आता ‘या’ पेनी स्टॉकमधून मिळू शकतो 59% रिटर्न
Jaypee Power Ventures Share
Jaypee Power Ventures Share : 18 जुलै 2025 — शेअर बाजारात मोठ्या-मोठ्या कंपन्यांच्या घसरणीतून गुंतवणूकदारांमध्ये चिंता असताना, एक छोटा पेनी स्टॉक चांगलाच झगमगू लागला आहे. जयप्रकाश पॉवर वेंचर्स लिमिटेड या कंपनीच्या शेअरने गेल्या केवळ सात ट्रेडिंग सत्रांत तब्बल ४६ टक्क्यांचा जबरदस्त परतावा दिला आहे. विशेष म्हणजे, तज्ज्ञांच्या अंदाजानुसार या शेअरमध्ये अजूनही सुमारे ५९ टक्के वाढीची शक्यता असून, त्यामुळे अल्प गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला आहे.
हे पण वाचा : पावसाबाबत मोठी अपडेट! आज ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट
गेल्या आठवड्याभरात बाजारात तेजी-घसरणीच्या लाटा येत असतानाच, जयप्रकाश पॉवर वेंचर्सने मात्र दमदार कामगिरी केली. ११ जुलै रोजी सुमारे १५.८० रुपयांच्या पातळीवर असलेला हा शेअर, अवघ्या सात दिवसांत २३ रुपयांपार गेला. शुक्रवारी (18 जुलै) तो १.४७% वाढीसह २३.०७ रुपयांवर बंद झाला. दिवसभरात त्याने २३.२४ रुपयांचा उच्चांक गाठला, तर २२.४१ रुपयांपर्यंत खाली आला होता.
या छोट्या किंमतीच्या शेअरच्या मागे मोठे मार्केट मूव्हमेंट्स आहेत. मागील वर्षभरात या शेअरची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी १२.३६ रुपये होती, तर उच्चांकी पातळी २७.७ रुपये. सध्याचा व्यवहार या दोन्ही टोकांच्या मधोमध असून, तांत्रिक विश्लेषणानुसार हा शेअर पुन्हा आपल्या उच्चांकी स्तराकडे वाटचाल करू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.
हे पण वाचा : सोन्याचा भाव गगनाला भिडला! मुंबई-पुण्यात १० ग्रॅमसाठी किती मोजावे लागणार?
कंपनीबाबत बोलायचं झाल्यास, जयप्रकाश पॉवर वेंचर्स ही जयप्रकाश असोसिएट्स ग्रुपची एक ऊर्जा क्षेत्रातील कंपनी आहे. जलविद्युत आणि तापीय विद्युत प्रकल्प राबविणाऱ्या या कंपनीने गेल्या काही तिमाहीत वित्तीय सुधारणांचा धडाका लावला आहे. कर्जाचा भार कमी करताना उत्पन्नातही वाढ केली आहे. त्यामुळेच गुंतवणूकदारांचा या कंपनीवरील विश्वास वाढतो आहे.
सध्या या स्टॉकचे मार्केट कॅप ₹15,790 कोटींच्या आसपास असून, त्यामध्ये सातत्याने व्हॉल्युमही वाढताना दिसत आहे. कमी किंमतीत उपलब्ध असल्यामुळे लघु गुंतवणूकदार यामध्ये मोठ्या प्रमाणात रस दाखवत आहेत.
