June 19, 2026

सोन्याचा भाव गगनाला भिडला! मुंबई-पुण्यात १० ग्रॅमसाठी किती मोजावे लागणार?

0
Gold Price Today

Gold Price Today

Gold Price Today : देशातील सराफा बाजारात पुन्हा एकदा प्रचंड हालचाल झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार सुरू असून, गुरुवारनंतर शुक्रवारी म्हणजेच १८ जुलै २०२५ रोजी सोन्याच्या किमतींनी पुन्हा एकदा सामान्य ग्राहकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. सकाळी सौम्य घसरणीनंतर दुपारपर्यंत दरांनी जोरदार उसळी घेतली. परिणामी, मुंबई आणि पुण्यात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर तब्बल ९७,६८० रुपये इतका झाला.

हे पण वाचा : आज कोणाचे भाग्य चमकणार? कोणाला मिळणार नव्या जबाबदाऱ्या? वाचा तुमचं राशीभविष्य

सोनं ही भारतीय संस्कृतीतील केवळ गुंतवणूक नसून ती मान-सन्मानाचं आणि भावनिक मूल्य असलेली बाब मानली जाते. त्यामुळेच अशा दरवाढीने अनेक घरांचं बजेट कोलमडण्याची शक्यता निर्माण होते. विशेषतः लग्नसराईच्या काळात सोनं खरेदी करण्याचा काळ असतो, अशा वेळी अशी वाढ ग्राहकांना मोठा आर्थिक ताण देणारी ठरते.

देशभरातील दरांची स्थिती

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, आज देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा सरासरी दर ९७,८६० रुपये, तर २२ कॅरेटसाठी तो ८९,७०५ रुपये इतका आहे. चांदीच्या दरातही बदल झाला असून १ किलो चांदीचा दर १,१२,८५० रुपये आणि १० ग्रॅमसाठी १,१२९ रुपये इतका आहे.

मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिक या चारही शहरांमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ८९,५४० रुपये आणि २४ कॅरेटचा दर ९७,६८० रुपये इतका आहे. दरम्यान, राज्यनिहाय उत्पादन शुल्क, जीएसटी आणि मेकिंग चार्जमुळे अंतिम किंमतीत बदल दिसतो.

हे पण वाचा : घसरणीचा झटका! मार्केट रेड झोनमध्ये; आठवड्याच्या शेवटच्या दिवशी ‘या’ शेअर्सनी दिला नुकसानाचा धक्का

२२ आणि २४ कॅरेट सोनं म्हणजे काय?

सोनं खरेदी करताना अनेकांना ‘२२ की २४ कॅरेट?’ असा प्रश्न विचारला जातो. २४ कॅरेट सोने हे शुद्धतम (९९.९९%) असते, मात्र त्याची टिकाऊपणा कमी असतो, त्यामुळे ते दागिने बनवण्यासाठी कमी वापरले जाते. याउलट २२ कॅरेट सोन्यात थोडा मिश्रधातू मिसळलेला असतो, त्यामुळे ते दागिन्यांसाठी अधिक योग्य ठरतं.

Leave a Reply

Discover more from Punelive24

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading