October 30, 2026

जगातील 5 हॉटेल्स जिथे एक रात्र थांबायलाही विकावे लागेल संपूर्ण घरदार

0
Most Expensive Hotels

Most Expensive Hotels

Most Expensive Hotels : सुट्टीचा प्लॅन करताना किंवा पर्यटनस्थळी जाताना हॉटेल निवडणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट असते. बहुतांश वेळा आपण आपल्या बजेटमध्ये बसणारी रूम बुक करतो—कधी २ हजार, कधी ५-७ हजारपर्यंत. पण जर एखादं हॉटेलचं एक रात्रीचं भाडं तब्बल ८५ लाखांपेक्षा जास्त असेल, तर? हो, आश्चर्य वाटेल ना? पण जगात अशी काही हॉटेल्स आहेत, जिथे एक रात्र राहण्यासाठी कोट्यवधी रुपये मोजावे लागतात. इतकं की, त्या रकमेइतकं बजेट असेल, तर भारतात एखादं फ्लॅट, आलिशान गाडी किंवा अगदी फार्महाउसही विकत घेता येईल!

हे पण वाचा : राज्यात पावसाची शक्यता! तुमचा जिल्हा येलो अलर्टमध्ये आहे का? बघा यादी!

या महागड्या हॉटेल्समध्ये राहणं म्हणजे केवळ आराम नव्हे, तर एक प्रकारचं वैभवाचं प्रदर्शन. हे हॉटेल्स म्हणजे श्रीमंतांचे थांबे, प्रसिद्ध कलाकार, अब्जाधीश उद्योगपती आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्हीआयपींच्या लक्झरी हॉलिडे डेस्टिनेशन्स!

लास वेगासमधील ‘पाम्स कॅसिनो रिसॉर्ट’ हे हॉटेल सध्या जगातील सर्वात महागड्या हॉटेल्सच्या यादीत अग्रेसर आहे. येथे “एम्पथी सुइट स्काय व्हिला” नावाच्या रूमचं एका रात्रीचं भाडं तब्बल १ लाख डॉलर्स, म्हणजे जवळपास ८६ लाख रुपये आहे. ब्रिटिश कलाकार डेमियन हर्स्ट यांनी डिझाईन केलेली ही रूम म्हणजे कलात्मकतेचं आणि वैभवाचं परमोच्च मिश्रण आहे. दोन मास्टर बेडरूम्स, खास मसाज टेबल, सॉल्ट रिलॅक्सेशन रूम, आणि झकास झकुजीसह स्ट्रिप व्ह्यू—हे सगळं इथे मिळतं.

स्वित्झर्लंडच्या जिनिव्हामधील ‘हॉटेल प्रेसिडेंट विल्सन’ येथील रॉयल पेंटहाऊस सूट सुद्धा अव्वाच्या सव्वा किमतीचा आहे. एका रात्रीचं भाडं जवळपास ८० हजार डॉलर्स. जिनिव्हा लेकमधील नजारा, ८ व्या मजल्यावरून दिसणारा अल्प्स पर्वतरांगांचा सौंदर्यदृश्य आणि काचांमधून झळकणारी आलिशानता—या सुईटचा अनुभव जगण्यासारखा आहे.

न्यूयॉर्कमधील ‘द मार्क हॉटेल’ हे सुद्धा लक्झरी आणि डिझाईन यांचं परिपूर्ण मिश्रण मानलं जातं. येथील ‘द मार्क पेंटहाऊस’ सुइटची किंमत ७५ हजार डॉलर्स प्रति रात्र असून, हे अमेरिकेतील सर्वात मोठं हॉटेल सुईट मानलं जातं. फ्रेंच डिझायनर जॅक्स ग्रांज यांनी त्याचं डिझाईन तयार केलं आहे.

हे पण वाचा : बापरे! सोन्याचा दर इतका वाढलाय का? ताजे रेट्स पाहून घाम फुटेल!

मालदीवमधील ‘द मुराका’, हे जगातील पहिलं अंडरवॉटर हॉटेल मानलं जातं. या हॉटेलचा अर्धा भाग समुद्राच्या पाण्याखाली आहे. पाण्याखालील खोलीतून मासे, कोरल्स आणि समुद्राचं जिवंत दृश्य दिसतं. इथे एका रात्रीचं भाडं ६० हजार डॉलर्स आहे.

फ्रान्सच्या कान्स शहरातलं ‘हॉटेल मार्टिनेज’ हे फ्रेंच रिव्हिएरामधील प्रसिद्ध हॉटेल आहे. १९२० मध्ये उभारलेलं हे आर्ट डेको स्टाईल हॉटेल आजही राजेशाही थाटात पाहुण्यांचं स्वागत करतं. येथे ‘पेंटहाऊस सुइट’साठी एका रात्रीचं भाडं ५५ हजार डॉलर्स आहे.

Leave a Reply