June 17, 2026

सोने-चांदी दरात आज मोठा बदल! २४K ते १४K दर एका क्लिकवर जाणून घ्या

0
Gold Price Today 14 July 2025

Gold Price Today 14 July 2025

Gold Price Today 14 July 2025 : देशातील सोनं-चांदीच्या दरांमध्ये आज पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळत आहे. जागतिक बाजारपेठेतील अस्थिरता आणि व्यापार तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोनं-चांदीकडे गुंतवणूकदारांचा कल वाढल्याचे दिसून येत आहे. आज सकाळी ‘इंडिया बुलियन अ‍ॅण्ड ज्वेलर्स असोसिएशन’ (IBJA) च्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर झालेल्या दरांनुसार २४ कॅरेट शुद्ध सोनं ९७,५११ रुपये प्रति १० ग्रॅम दराने विक्रीस आहे. तर चांदीने तर अक्षरशः उच्चांक गाठला असून तिचा दर १,१०,२९० रुपये प्रति किलोपर्यंत गेला आहे. एमसीएक्सवर चांदी १,१४,००० चा टप्पा पार करून गेल्याची नोंद झाली आहे.

हे पण वाचा : आज कोणाच्या राशीवर धनवर्षा, कोणाच्या नशिबात संकट? जाणून घ्या एका क्लिकवर

गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. केवळ दोन दिवसांपूर्वीच म्हणजे शुक्रवारच्या व्यवहारात दिल्लीच्या सराफा बाजारात ९९.९ टक्के शुद्धतेच्या सोन्याचा दर ९९,३७० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला होता. याच वेळी चांदीचा भाव देखील तब्बल १,५०० रुपयांनी वधारला होता. ही वाढ काही तात्पुरती नसून, जागतिक घडामोडींचा सरळ परिणाम भारतीय सराफा बाजारावर होत असल्याचे संकेत मिळत आहेत.

तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विविध देशांवरील आयात शुल्क वाढवण्याचे संकेत दिल्यानंतर जागतिक व्यापारात अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी, चलन बाजारात अस्थिरता निर्माण झाली असून गुंतवणूकदार सोनं-चांदीसारख्या सुरक्षित पर्यायांकडे वळले आहेत. ही स्थिती सोन्याच्या दरवाढीला चालना देत आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजचे जिंस विश्लेषक सौमिल गांधी यांनी सांगितले की, जागतिक व्यापारातल्या अस्थिरतेमुळे सुरक्षित गुंतवणुकीचा ओघ सोन्याकडे वळला आहे आणि हीच दरवाढीची प्रमुख कारणं आहेत.

सोन्याच्या वायदा बाजारातही ही तेजी स्पष्ट जाणवत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये ऑगस्ट डिलिव्हरीसाठी सोनं ५४० रुपयांनी वधारून ९७,२३१ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले. चांदीच्याही वायदा व्यवहारात घसघशीत वाढ झाली असून सप्टेंबर डिलिव्हरीचा दर १,७६२ रुपयांनी वाढून १,१०,८८५ रुपये प्रति किलो इतका झाला आहे. या दरवाढीमुळे गुंतवणूकदारांमध्ये हालचाल वाढली असून अनेकांनी सोन्याच्या खरेदीसाठी मोर्चा वळवला आहे.

हे पण वाचा : आयटीआर भरणार असाल तर ‘ही’ कागदपत्रं ठेवा तयार, नाहीतर भरावा लागू शकतो दंड! वाचा सविस्तर

येत्या काही दिवसांत अमेरिकेत जाहीर होणाऱ्या उपभोक्ता महागाई निर्देशांक (CPI) कडे संपूर्ण बाजाराचं लक्ष लागलं आहे. हा निर्देशांक सोनं-चांदीच्या भविष्यातील किंमतींवर परिणाम करणार असल्याचं विश्लेषकांचं मत आहे. त्यानंतर व्याजदरांबाबत घेतले जाणारे निर्णय सराफा बाजाराची दिशा ठरवू शकतात.

 

Leave a Reply

Discover more from Punelive24

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading