November 2, 2026

शेअर बाजारात मोठी संधी! अदानी विल्मरवर 37% रिटर्न देणारे तज्ज्ञांचे मत

0
Adani Wilmar Share

Adani Wilmar Share

Adani Wilmar Share : शेअर बाजारात गुंतवणूकदारांची नजर आता अदानी विल्मर लिमिटेड (AWL) या शेअरवर लागली आहे. बुधवारी, १६ जुलै २०२५ रोजीच्या ट्रेडिंग सत्रात या शेअरने सौम्य घसरण नोंदवली असली तरी, बाजारातील तज्ज्ञांनी यासाठी एक महत्त्वाची भाकीत केली आहे – तब्बल ३७ टक्क्यांपर्यंतचा संभाव्य परतावा (Return)!

हे पण वाचा : जिओ फायनान्शिअल स्टॉकवर तेजीची शक्यता, तज्ज्ञांचा गुंतवणुकीचा सल्ला

एडब्ल्यूएल अ‍ॅग्री बिझनेस लिमिटेड म्हणजे अदानी विल्मर हा शेअर आज ०.५० टक्क्यांनी घसरून २६१.८५ रुपयांवर बंद झाला. दिवसाची सुरुवात २६३.२० रुपयांवर झाली आणि शेवटपर्यंत त्याने २६३.४० रुपयांचा उच्चांक आणि २५९.९५ रुपयांचा नीचांक गाठला. ही किंमत जरी काहीशी कमी भासत असली, तरी दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी ही सुवर्णसंधी मानली जात आहे.

या शेअरची मागील ५२ आठवड्यांची उच्चांकी किंमत ४०३.९५ रुपये होती, तर नीचांकी पातळी २३१.५५ रुपये. म्हणजेच, सध्याचा भाव हा त्याच्या सर्वोच्च पातळीपेक्षा ३५ टक्क्यांनी कमी आहे. परिणामी, तज्ज्ञांचे मत आहे की शेअरमध्ये ‘अपसाइड पोटेन्शियल’ खूप मोठं आहे.

बाजारातील नामांकित ब्रोकरेज कंपन्यांनी यासाठी टार्गेट प्राईस ठरवली आहे ती ३५८ रुपये, जी सध्याच्या किंमतीपेक्षा सुमारे ३७% अधिक आहे. अशा प्रकारच्या स्पष्ट शिफारसीने दीर्घकालीन गुंतवणूकदारांना आत्मविश्वास मिळत आहे.

हे पण वाचा : ‘या’ बँकेकडून ऐतिहासिक पाऊल! पहिला बोनस शेअर आणि डिव्हिडंड वाटप लवकरच?

अदानी विल्मर ही खाद्यतेल, आहारपूरक उत्पादनं, पॅकेज्ड फूड इत्यादी क्षेत्रात कार्यरत एक प्रमुख कंपनी असून भारतात तिचा बाजार मोठा आहे. ग्रामीण भागात ब्रँड ओळख आणि सप्लाय चेन मजबूत असल्याने कंपनीच्या महसुलात सातत्याने वाढ होत आहे. त्यातच शेवटच्या आर्थिक तिमाहीत कंपनीने समाधानकारक नफाही नोंदवला होता.

या पार्श्वभूमीवर, अनेक गुंतवणूक सल्लागार अदानी विल्मरच्या शेअरकडे ‘BUY’ रेटिंग देत आहेत. बाजारातील सध्याच्या अस्थिरतेच्या काळातही हा शेअर एक ‘स्टेबल प्ले’ मानला जातोय. कंपनीचा ३४,००० कोटींहून अधिकचा मार्केट कॅप तिच्या स्थैर्याची साक्ष देतो.

Leave a Reply