स्वस्त दरात मोठा नफा! IRB Infra शेअरमधून मिळणार 38.89% परतावा, जाणून घ्या डिटेल्स
IRB Infra Share Price Today
IRB Infra Share Price Today : शेअर बाजारात सध्या अस्थिरतेचं वातावरण असलं तरी काही निवडक शेअर्स अशा काळातही गुंतवणूकदारांना आकर्षित करत आहेत. त्यातच IRB Infrastructure Developers Ltd या इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातील दिग्गज कंपनीचा शेअर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अवघ्या ₹48.24 च्या सध्याच्या किंमतीवर उपलब्ध असलेल्या या शेअरला 38.89% पर्यंतचा संभाव्य रिटर्न मिळू शकतो, असा विश्वास HDFC Securities या ब्रोकरेज फर्मने व्यक्त केला आहे.
हे पण वाचा : फक्त 61 रुपयांचा शेअर, दिला तब्बल 843% परतावा! पुढचं टार्गेट किती जाणून घ्या
गुरुवार, 24 जुलै 2025 रोजी शेअर बाजारात सुरुवातीपासूनच घसरण दिसून आली. सेन्सेक्स 225 अंकांनी घसरून 82,501 वर स्थिरावला, तर निफ्टी 54 अंकांनी खाली येत 25,165 अंकांवर बंद झाला. निफ्टी बँक आणि आयटी निर्देशांकांनाही या घसरणीचा फटका बसला. अशा बाजारातही IRB Infrastructure चा शेअर गुंतवणूकदारांच्या रडारवर होता.
आजचा दिवस IRB शेअरसाठी काहीसा चढ-उताराचा ठरला. ट्रेडिंगची सुरुवात 48.70 रुपये दराने झाली आणि दिवसभरात शेअरने 48.81 रुपयांचा उच्चांक गाठला. मात्र, काहीशी घसरण होऊन शेवटी तो ₹48.24 दरावर स्थिरावला. 52 आठवड्यांच्या तुलनेत पाहिल्यास, या शेअरने याआधी ₹67.83 चा उच्चांक गाठलेला आहे, तर नीचांकी स्तर ₹40.96 इतका होता.
सध्याच्या किंमतीनुसार IRB इन्फ्राचे एकूण मार्केट कॅप सुमारे ₹29,180 कोटींवर पोहोचले आहे. ही कंपनी भारतातील सर्वांत मोठ्या टोल-रोड ऑपरेटरपैकी एक आहे आणि देशभरात इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प राबवताना तिची कामगिरी सातत्याने सुधारते आहे. याच पार्श्वभूमीवर HDFC Securities ने या शेअरबाबत ADD रेटिंग दिलं असून ₹67 पर्यंतचा टार्गेट प्राईस निश्चित केला आहे, जो सध्याच्या दराच्या तुलनेत जवळपास 39 टक्क्यांनी जास्त आहे.
हे पण वाचा : बजाज हाउसिंग फाइनेंस शेअरवर 32% रिटर्नची शक्यता! गुंतवणूकदारांसाठी संधीच संधी
IRB इन्फ्राने अलीकडच्या काळात अनेक महत्वाचे राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प हातात घेतले असून, त्यांच्या निष्पादनातही सुधारणा दिसून आली आहे. याशिवाय, PPP (Public-Private Partnership) मॉडेलवर आधारित नवे करार कंपनीला भक्कम आर्थिक बळ देण्यास हातभार लावत आहेत.
तज्ज्ञांच्या मते, जे गुंतवणूकदार मिड-कॅप किंवा इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातील स्टॉक्समध्ये गुंतवणुकीसाठी उत्सुक आहेत, त्यांच्यासाठी IRB Infrastructure हा शेअर मध्यम ते दीर्घकालीन दृष्टीने फायदेशीर ठरू शकतो.
