दिग्गज गुंतवणूकदार डॉली खन्ना यांची मोठी खरेदी; ‘या’ शेअरने 1 वर्षात दिला 150% परतावा
Multibagger Stock 2025
Multibagger Stock 2025 : शेअर बाजारातील एका कमी चर्चेतल्या शेअरने गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘मंगलोर केमिकल्स अँड फर्टिलायझर्स’ या खत उत्पादक कंपनीच्या शेअरने केवळ १२ महिन्यांत १५०% वाढ नोंदवली असून, आता दिग्गज गुंतवणूकदार डॉली खन्नांनी या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत नव्या गुंतवणूकदारांना आकर्षित केलं आहे.
हे पण वाचा : सरकारी शेअर्समध्ये ‘स्मार्ट मनी’चा पाऊस! ‘या’ ८ शेअर्सनी दिला 65% पर्यंत परतावा
२१ जुलै रोजी, सोमवारी या शेअरने इंट्राडे व्यवहारात ८.५ टक्क्यांची उडी घेतली आणि ३१० रुपयांपर्यंत पोहोचत ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर बंद झाला. दिवसाची सुरुवात २८९.०५ रुपयांवर झाली होती, ज्यातून शेअरमधील वेग स्पष्ट दिसतो. या वाढीचं मुख्य कारण म्हणजे डॉली खन्ना यांच्याकडून झालेली मोठी खरेदी.
जून २०२५ साठी जाहीर झालेल्या शेअरहोल्डिंग डेटानुसार, डॉली खन्ना यांनी मंगलोर केमिकल्स अँड फर्टिलायझर्सचे तब्बल १३,६४,३९३ शेअर्स विकत घेतले आहेत. या खरेदीनंतर कंपनीतील त्यांचा एकूण हिस्सा ३.३३ टक्क्यांवर पोहोचला आहे. याआधी त्यांच्या नावावर २५.८७ लाख शेअर्स होते. बाजारात त्यांची हालचाल ‘स्मार्ट मनी’ समजली जाते, त्यामुळे त्यांचा विश्वास वाढल्यामुळे अनेक गुंतवणूकदार देखील या शेअरकडे आकर्षित होत आहेत.
कंपनीचे प्रमोटर सध्या ६०.६३ टक्के शेअरहोल्डिंगसह नियंत्रण ठेवून आहेत, तर उर्वरित ३९.३७ टक्के शेअर्स जनतेच्या मालकीचे आहेत.
विश्लेषकांचे म्हणणे आहे की, या शेअरची आगामी लक्ष्य किंमत ३२५ ते ३५० रुपयांच्या दरम्यान असू शकते. मागील तीन महिन्यांत या शेअरने ५४ टक्के परतावा दिला असून, यामुळे तो २०२५ सालातील आघाडीच्या मल्टीबॅगर शेअर्सपैकी एक ठरला आहे. फक्त या वर्षातच या शेअरची किंमत ९१ टक्क्यांनी वाढली आहे.
हे पण वाचा : ११ शेअर्सवर Strong Buy ची शिफारस! वर्षभरात होणार जबरदस्त कमाई, वाचा यादी
विशेष म्हणजे, मागील पाच वर्षांच्या कालावधीत मंगलोर केमिकल्सचा शेअर तब्बल ७७५% वाढला आहे. एका बाजूला शेअरचे तांत्रिक विश्लेषण मजबूत संकेत देत आहे, तर दुसऱ्या बाजूला डॉली खन्नांसारख्या गुंतवणूकदारांचा सहभाग ही गुंतवणूकविश्वासाठी मोठी खात्रीची बाब ठरत आहे.
