सलग 24 दिवस अप्पर सर्किट! ‘हा’ शेअर गुंतवणूकदारांना करत आहे मालामाल
Colab Platforms Share
Colab Platforms Share : शेअर बाजारात रोज नवनवे चढ-उतार पाहायला मिळतात. अनेक शेअर्स काही दिवस तेजीत असतात, तर काही शेअर्स झपाट्याने घसरतात. मात्र, काही निवडक शेअर्स असे असतात की जे बाजाराच्या चढ-उतारांपासून अलिप्त राहत आपली वाटचाल दमदारपणे सुरू ठेवतात. ‘कोलॅब प्लॅटफॉर्म्स’ या स्मॉल कॅप आयटी कंपनीचा शेअर सध्या याच वर्गातला हिरा ठरत आहे.
हे पण वाचा : दिग्गज गुंतवणूकदार डॉली खन्ना यांची मोठी खरेदी; ‘या’ शेअरने 1 वर्षात दिला 150% परतावा
गेल्या सलग २४ ट्रेडिंग सत्रांपासून या शेअर्सने दररोज २ टक्क्यांचे अप्पर सर्किट गाठले आहे. सोमवारी, २१ जुलै रोजी या शेअरची किंमत ४७.५८ रुपयांवर पोहोचली. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे लक्ष या शेअरने अक्षरशः वेधून घेतले आहे. कारण, कमी वेळात मोठा नफा देणाऱ्या शेअर्सपैकी हा एक ठरत आहे.
पार्श्वभूमी पाहता, ‘Colab Platforms’ ही कंपनी क्लाउड तंत्रज्ञान, संगणक हार्डवेअर, सॉफ्टवेअर सोल्यूशन्स आणि सिक्युरिटीज ट्रेडिंग या क्षेत्रात काम करते. मात्र, अलीकडे कंपनीने ई-स्पोर्ट्स क्षेत्रात प्रवेश करत नव्या युगात उडी घेतली आहे. याच घोषणेनंतर या शेअरने आकाशाला गवसणी घातली.
कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पुनीत सिंग यांनी सांगितले की, “भारताच्या डिजिटल-पहिल्या पिढीसाठी गेमिंग इकोसिस्टम तयार करणे हे आमचे उद्दिष्ट आहे.” त्यांनी सांगितले की २०२४ मध्ये ई-स्पोर्ट्स क्षेत्राची जागतिक बाजारपेठ १.७ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचणार असून, २०३० पर्यंत ती ६ अब्ज डॉलर्सच्या घरात पोहोचेल असा अंदाज आहे.
या पार्श्वभूमीवर, कोलॅबने भारतात २५ कोटी रुपयांचा क्रीडा-तंत्रज्ञान प्रवेगक (Accelerator) कार्यक्रम सुरू केला आहे. त्यामुळे तरुण उद्योजक आणि नवकल्पनांना चालना मिळणार आहे.
गेल्या वर्षभरात कोलॅब प्लॅटफॉर्म्सच्या शेअरने ५३६ टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली असून, केवळ एका महिन्यातच ६० टक्क्यांची झपाट्याने वाढ झाली आहे. गुंतवणूकदारांसाठी हा शेअर आता आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे.
हे पण वाचा : सरकारी शेअर्समध्ये ‘स्मार्ट मनी’चा पाऊस! ‘या’ ८ शेअर्सनी दिला 65% पर्यंत परतावा
याशिवाय, बोनस शेअर्स व स्टॉक स्प्लिट्समुळेही या शेअरचा विश्वास वाढला आहे. २१ मे २०२५ रोजी कंपनीने शेअर्सचा २:१ प्रमाणात स्टॉक स्प्लिट केला होता. तर, मार्च २०२४ मध्ये १:१ बोनस शेअर्स दिले होते.
ताज्या आर्थिक आकडेवारीनुसार, कंपनीने २४-२५ या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत २०.४९ कोटी रुपयांचा महसूल, ०.९५ कोटी निव्वळ नफा आणि १.२५ कोटी EBITD नोंदवला आहे. एप्रिल २०२५ मध्ये कंपनीने अंतरिम लाभांश जाहीर करत गुंतवणूकदारांना दिलासा दिला.
