October 29, 2026

सोन्याच्या किमतीत मोठा उलटफेर! आजचे दर बघून तुम्हीही थक्क व्हाल!

0
Gold Price Today India

Gold Price Today India

Gold Price Today India : गेल्या काही आठवड्यांपासून सोन्याचे दर सातत्याने वाढत असल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांचा खिसा चांगलाच हलका झाला होता. लग्नसराई असो वा गुंतवणुकीचा हेतू – सोने खरेदी करणे सामान्य ग्राहकासाठी आता परवडणं कठीण झालं आहे. मात्र आज, गुरुवार २४ जुलै २०२५ रोजी, सराफा बाजारात एक अनपेक्षित उलटफेर घडताना दिसला. पहाटेपर्यंत दरात घसरण जाणवली, पण नंतर पुन्हा एकदम भाव उंचावले. त्यामुळे गुंतवणूकदार आणि ग्राहक दोघांच्याही भुवया उंचावल्या आहेत.

हे पण वाचा : पुन्हा सुरु होतोय पाऊस! आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये रेड, ऑरेंज अलर्ट? वाचा हवामान विभागाचा अंदाज

सध्याच्या दरांवर नजर टाकली तर – २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा दर आज ९९,४८० रुपये झाला आहे, तर २२ कॅरेट सोनं ९१,१९० रुपये प्रति १० ग्रॅम दराने विकले जात आहे. चांदीबाबत बोलायचं झालं, तर एका किलो चांदीचा दर १,१५,२३० रुपये झाला आहे. अर्थात, ही दरांची स्थिती शहरानुसार थोडीफार वेगळी असते आणि त्यावर उत्पादन शुल्क, राज्य कर, आणि मेकिंग चार्जचा प्रभावही मोठा असतो.

शहरनिहाय दर पाहिल्यास, मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर अशा प्रमुख शहरांमध्ये २२ कॅरेट सोनं आज ९१,०२५ रुपये दराने विकले जात आहे, तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ९९,३०० रुपये आहे. या दरात काही मिनिटांचे किंवा तासांचे बदलही दिसून येतात. त्यामुळे जर तुम्ही सोनं खरेदी करण्याच्या तयारीत असाल, तर स्थानिक सराफा बाजारातील अचूक दर पाहून निर्णय घेणं आवश्यक ठरतं.

सोने खरेदी करताना एक प्रश्न हमखास विचारला जातो – २२ कॅरेट की २४ कॅरेट? बहुतांश ग्राहकांना यातील फरक माहिती नसतो. २४ कॅरेट सोने हे ९९.९% शुद्ध असतं, पण याचा उपयोग दागिने तयार करण्यासाठी केला जात नाही. कारण ते फारसं टिकाऊ नसतं. म्हणून २२ कॅरेट सोनं – ज्यामध्ये तांबे, चांदी, जस्त यांसारख्या धातूंचं मिश्रण असतं – हेच दागिन्यांमध्ये अधिक वापरलं जातं.

हे पण वाचा : आज कोणाला लाभ? कोणाला धोका? तुमची रास काय सांगते ते जाणून घ्या!

आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयाचं चलन थोडं मजबूत झालं आणि अमेरिकेच्या महागाईच्या आकड्यांमध्ये बदल झाल्यामुळे भारतीय सराफा बाजारातही तात्काळ परिणाम झाला. त्यामुळे सकाळच्या घसरणीनंतर पुन्हा एकदा मागणी वाढली आणि भाव उंचावले.

Leave a Reply