October 29, 2026

स्वस्तात खरेदी करा ‘हा’ ऊर्जा क्षेत्रातील शेअर, 24% नफा मिळण्याची शक्यता!

0
IREDA Share Price Today

IREDA Share Price Today

IREDA Share Price Today : शेअर बाजारात अस्थिरता असतानाही काही मोजके पीएसयू शेअर्स गुंतवणूकदारांच्या नजरेत भरत आहेत. अशाच कंपन्यांपैकी एक म्हणजे इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड (IREDA). देशाच्या हरित ऊर्जा स्वप्नाला पूरक असलेल्या या सरकारी कंपनीचा शेअर सध्या बाजारात तुलनेत खूपच स्वस्त दरात उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, तज्ज्ञांनी या शेअरवर 24.76% पर्यंत अपसाईड टार्गेट दिले असून, यामुळे अल्प ते मध्यमकालीन गुंतवणुकीसाठी हा शेअर चांगला पर्याय ठरू शकतो.

हे पण वाचा : येस बँक शेअर होल्ड करायचा की विकायचा? तज्ज्ञांचं मोठं मत समोर

IREDA चा शेअर मंगळवारी, 22 जुलै 2025 रोजी 157.1 रुपयांवर बंद झाला. दिवसभरातील व्यवहारात या शेअरने 158.49 रुपयांचा उच्चांक गाठला, तर किमान दर होता 156.85 रुपये. विशेष म्हणजे, गेल्या 52 आठवड्यांतील उच्चांक 282.9 रुपये इतका असून, नीचांकी पातळी 137.01 रुपये इतकी आहे. म्हणजेच, सध्याच्या दरात हा शेअर आपल्या उच्चांकापेक्षा जवळपास 44 टक्क्यांनी कमी दराने मिळतो आहे.

या पार्श्वभूमीवर काही ब्रोकरेज आणि बाजार विश्लेषकांनी या शेअरवर सकारात्मक दृष्टीकोन व्यक्त केला आहे. विश्लेषकांच्या मते, हरित ऊर्जा क्षेत्रातील सतत वाढणारी मागणी आणि सरकारचा पायाभूत प्रकल्पांकडे कल लक्षात घेतल्यास, IREDA कंपनीच्या व्यावसायिक संधी प्रचंड आहेत. त्यामुळे पुढील काही महिन्यांत या शेअरने 196 रुपयांपर्यंतची झेप घेतल्यास आश्चर्य वाटायला नको.

हे पण वाचा : ‘हा’ स्वस्त शेअर देतोय झपाट्याने रिटर्न! रिलायन्स पॉवरवर मोठा भरोसा

IREDA चा मार्केट कॅप सध्या 44,105 कोटी रुपये इतका आहे. कंपनीचा व्यवसाय मुख्यतः सौर, पवन आणि अन्य अक्षय ऊर्जा प्रकल्पांना कर्ज देण्यावर आधारित असून, देशाच्या ऊर्जा सुरक्षिततेत मोलाची भूमिका बजावत आहे. विशेष म्हणजे, ‘ग्रीन फाइनान्सिंग’च्या क्षेत्रात IREDA ही भारतातील आघाडीची सरकारी कंपनी मानली जाते.

 

Leave a Reply