October 29, 2026

‘हा’ स्वस्त शेअर देतोय झपाट्याने रिटर्न! रिलायन्स पॉवरवर मोठा भरोसा

0
Reliance Power Share Price

Reliance Power Share Price

Reliance Power Share Price : शेअर बाजारात आजही गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय उपलब्ध असले, तरी काही विशिष्ट शेअर्स मात्र त्यांच्या स्वस्त दरामुळे आणि भविष्यातील प्रचंड वाढीच्या शक्यतेमुळे सतत चर्चेत असतात. असाच एक शेअर म्हणजे रिलायन्स पॉवर लिमिटेड. सध्या अवघ्या ६२ रुपयांच्या दरम्यान ट्रेड होणारा हा शेअर अनेक बाजारतज्ज्ञांच्या मते पुढील काही महिन्यांत दुपटीने मूल्यवाढ होण्याची क्षमता बाळगतोय.

हे पण वाचा : पैशाचा पाऊस! सुझलॉन शेअरने दिला जबरदस्त नफा, पुढील टार्गेट उघड

मंगळवार, २२ जुलै २०२५ रोजी शेअर बाजारात सौम्य तेजी पाहायला मिळाली. बीएसई सेन्सेक्सने १३२.०४ अंकांनी वाढ नोंदवून ८२,३३२.३८ अंकांवर पोहोच घेतली. तर निफ्टी निर्देशांक १५.६० अंकांनी वाढून २५,१०६.३० वर स्थिरावला. अशा स्थिर वातावरणातही रिलायन्स पॉवरच्या शेअरमध्ये सौम्य घसरण झाली. कंपनीचा शेअर आज ६३.२५ रुपयांवर उघडला आणि दिवसभरात ६२ रुपयांच्या नीचांकी स्तरावर पोहोचला. दिवसअखेर हा शेअर १.५० टक्क्यांनी घसरून ६२.५८ रुपयांवर बंद झाला.

गेल्या काही महिन्यांत रिलायन्स पॉवरने गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. एक वर्षापूर्वी २५ रुपयांजवळ असलेला हा शेअर आता ७६ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचून सध्या ६२ रुपयांच्या आसपास स्थिरावला आहे. त्यामुळे, हा शेअर घेतलेल्यांनी मोठा नफा कमावलेला आहे. मात्र बाजारात अशीच अपेक्षा आहे की ही घसरण तात्पुरती असून पुढे हा शेअर पुन्हा उंच भरारी घेईल.

या शेअरचा सध्याचा मार्केट कॅप सुमारे २५,८३६ कोटी रुपये इतका आहे. कंपनीने काही महत्त्वाचे प्रकल्प सुरू केले असून ऊर्जा क्षेत्रातील सरकारी धोरणांचा थेट फायदा तिला होण्याची शक्यता आहे. विशेषतः रिन्युएबल एनर्जीमध्ये कंपनीची धोरणात्मक पावले भविष्यातील वाढीचे दार उघडू शकतात. त्यामुळे बाजारातील तज्ज्ञांनी या शेअरचं संभाव्य टार्गेट ९५ ते १०० रुपयांपर्यंत दिलं आहे.

हे पण वाचा : Jane Street ला भारतीय बाजारात पुन्हा एंट्री, सेबीकडून कडक अटींसह परवानगी

गुंतवणूकदारांमध्ये एक विश्वास निर्माण झाला आहे की, दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवून रिलायन्स पॉवरमध्ये केलेली गुंतवणूक मोठ्या परताव्यात रूपांतरित होऊ शकते. अनेक शेअर विश्लेषकांनी स्पष्ट सल्ला दिला आहे की, ज्यांच्याकडे हा शेअर आहे त्यांनी कोणत्याही परिस्थितीत तो विकू नये. कारण ही घसरण ही केवळ बाजारातील सामान्य चढउताराचा भाग आहे.

Leave a Reply