June 19, 2026

650 पेक्षा कमी सिबिल स्कोअर? तरीही मिळणार वैयक्तिक कर्ज; जाणून घ्या नेमकी काय आहे प्रक्रिया?

0
Low Cibil Score Loan

Low Cibil Score Loan

Low Cibil Score Loan : आर्थिक गरजा भागवण्यासाठी कर्ज घेणं हे आजच्या काळात सामान्य बाब झाली आहे. मात्र, सिबिल स्कोअर (CIBIL Score) कमी असल्यामुळे अनेकांना वेळोवेळी अपमानित व्हावं लागलंय, बँकांचे चकरा मारावे लागलेत. पण आता ही अडचण दूर होणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने 2025 मध्ये सिबिल स्कोअर संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेत नवे नियम लागू केले आहेत. या नव्या CIBIL Score Guidelines मुळे कमी स्कोअर असलेल्यांनाही कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

हे पण वाचा : घरबसल्या आधार कार्डवर मिळवा ५०,००० रुपयांचे वैयक्तिक कर्ज; जाणून घ्या प्रक्रिया

या नव्या मार्गदर्शक सूचनांचा उद्देश म्हणजे कर्ज प्रक्रिया अधिक पारदर्शक, वेगवान आणि ग्राहकस्नेही करणे. यापूर्वी फक्त चांगल्या स्कोअर असलेल्या व्यक्तींनाच कर्ज मंजुरी मिळत असे, पण आता बदलती परिस्थिती आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने, सिबिल स्कोअरची मोजणी आणि कर्जदाराच्या पात्रतेची प्रक्रिया नव्याने ठरवली जाणार आहे.

नवीन नियमानुसार, बँका आणि NBFC संस्थांना ग्राहकांच्या क्रेडिट माहितीचे अपडेट दर पंधरा दिवसांनी द्यावे लागणार आहेत. यामुळे आर्थिक शिस्त पाळणाऱ्या कर्जदारांना त्वरित फायदा मिळणार आहे. पूर्वी जिथे स्कोअर अपडेट होण्यासाठी महिना लागायचा, तिथे आता केवळ काही दिवसांत बदल स्पष्ट दिसणार आहेत. म्हणजेच, वेळेवर EMI भरल्यास त्याचा सकारात्मक परिणाम लवकर स्कोअरमध्ये उमटेल.

याशिवाय, जर एखाद्याचे कर्ज फक्त सिबिल स्कोअरवरून नाकारले गेले, तर त्याबाबत स्पष्ट कारण ग्राहकाला कळवणं बंधनकारक असेल. हे पाऊल बँकिंग क्षेत्रातील अपारदर्शकता कमी करणार आहे. ग्राहकांना दरवर्षी एकदा मोफत क्रेडिट रिपोर्ट देण्याची सक्ती करण्यात आली आहे, तर तक्रारींचं निराकरण ३० दिवसांच्या आत केलं गेलं नाही, तर संबंधित क्रेडिट ब्युरोला दररोज शंभर रुपये दंड ठोठावला जाणार आहे.

हे पण वाचा : महाराष्ट्रातील ३८ लाख वीज ग्राहकांना दिलासा! वीज बिलात १०% सूट; फडणवीसांची मोठी घोषणा

सर्वसामान्यांसाठी ही नियमावली आशेचा किरण ठरत आहे. विशेषतः जे विद्यार्थी, बेरोजगार, कंत्राटी कर्मचारी किंवा नवीन नोकरदार आहेत, त्यांना आता अधिक सहजतेने कर्ज मिळू शकणार आहे. NBFC आणि स्मॉल फायनान्स बँका यामध्ये मोठी भूमिका बजावणार आहेत. अशा संस्था सिबिल स्कोअरव्यतिरिक्त अर्जदाराचं उत्पन्न, नोकरीतील स्थैर्य, कर्जाची रक्कम आणि परतफेडीची क्षमताही पाहतील.

कमी स्कोअर असूनही कर्ज घ्यायचं असेल, तर काही स्मार्ट उपायही गरजेचे आहेत — जसं की सह-अर्जदार घेणं, थोडा जास्त डाउन पेमेंट करणं किंवा कमी रकमेचं लोन घेणं. यामुळे बँकांना तुमच्यावरील विश्वास वाढेल. शिवाय, जर कर्ज नाकारण्यात आलं, तरी आता कारण समजल्यामुळे पुढच्या अर्जासाठी योग्य सुधारणा करता येतील.

Leave a Reply

Discover more from Punelive24

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading