June 17, 2026

डॉली चायवालाचा मोठा निर्णय! ‘या’ पद्धतीने वाढवणार अजून मोठा भारतभर बिझनेस

0
Dolly Chaiwala Franchise

Dolly Chaiwala Franchise

Dolly Chaiwala Franchise : नागपूरच्या रस्त्यावरून सुरू झालेला ‘डॉली चायवाला’चा प्रवास आता थेट देशव्यापी व्यावसायिक ब्रँडमध्ये बदलू लागला आहे. अफलातून चहा सादरीकरणाची खास शैली, हटके वेशभूषा आणि सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओंमुळे डॉली चायवाला काही वर्षांतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला. पण केवळ प्रसिद्धीवर थांबण्याऐवजी डॉलीने आपला स्वतःचा टी ब्रँड देशभरात पोहोचवण्याचा निर्धार केला आहे.

हे पण वाचा : टेस्ला Model Y आणि Model 3 भारतात दाखल! किंमत, स्पीड आणि फीचर्स पाहून थक्क व्हाल

डॉली चायवाला सध्या फक्त चहा विकणारा नव्हे, तर एक प्रेरणादायी नाव ठरतो आहे. मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी भारत दौऱ्यात डॉलीच्या चहाचा आस्वाद घेतल्यानंतर त्याला आंतरराष्ट्रीय ओळख मिळाली. त्यानंतर डॉली दुबईतील लक्झरी जीवनशैलीत दिसू लागला, महागड्या गाड्या, सेलिब्रिटीसारखी प्रसिद्धी आणि जगभरातून चहासाठी येणारी गर्दी — हे सगळं एका सामान्य चहा विक्रेत्याचं चित्र नक्कीच नव्हतं. पण हे चित्र सत्य ठरतं आहे.

आता डॉली चायवाला आपल्या व्यवसायाचा विस्तार करत देशभरात ‘डॉली चायवाला फ्रेंचायझी’ सुरू करणार आहे. ‘डॉली’ ब्रँडच्या नावाने विविध शहरांमध्ये चहाची दुकाने व कॅफे उघडण्यात येणार असून इच्छुक उद्योजकांना यात सामील होण्याची संधी मिळणार आहे. इंस्टाग्रामवर याबाबतची अधिकृत घोषणा करताना डॉलीने लिहिलं, “आम्ही संपूर्ण भारतात आमचा व्हायरल स्ट्रीट ब्रँड घेऊन जात आहोत. साध्या गाड्यांपासून ते कॅफेपर्यंत, देशभर लाँच करत आहोत. आता ही एक संधी आहे – काहीतरी मोठं, देशी आणि हटके घडवण्याची.”

हे पण वाचा : 100 रुपये रोज गुंतवून बना लखपती! SIP योजनेचा खास प्लॅन वाचा

या पोस्टनंतर सोशल मीडियावर चर्चांचा पूर उसळला आहे. काहींनी ही गोष्ट अभिमानास्पद मानली, अनेकांनी डॉलीच्या संघर्ष आणि मेहनतीचं कौतुक केलं. दुसरीकडे काही नेटिझन्सनी भारतातील शिक्षणव्यवस्थेवर उपरोधिक टीका करत म्हटलं, “डिग्रीवाल्यांना नोकऱ्या नाहीत आणि चहा विकणारे उद्योगपती होत आहेत.”

 

Leave a Reply

Discover more from Punelive24

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading