June 13, 2026

टेस्ला Model Y आणि Model 3 भारतात दाखल! किंमत, स्पीड आणि फीचर्स पाहून थक्क व्हाल

0
Tesla India Launch

Tesla India Launch

Tesla India Launch : जगप्रसिद्ध इलेक्ट्रिक कार निर्माता ‘टेस्ला’ने अखेर भारतात आपल्या प्रवासाची भव्य सुरुवात केली आहे. आज मुंबईत वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) या उच्चभ्रू परिसरात टेस्लाच्या भारतातील पहिल्या शोरूमचं उद्घाटन पार पडलं. विशेष म्हणजे, या शोरूमची पाटी ‘मराठीत’ लावण्यात आली असून, “जय महाराष्ट्र” म्हणत टेस्लाने राज्याशी असलेली नाळ ठळकपणे अधोरेखित केली आहे.

हे पण वाचा : 100 रुपये रोज गुंतवून बना लखपती! SIP योजनेचा खास प्लॅन वाचा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या शोरूमचे उद्घाटन झाले. देशातील इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात ही एक ऐतिहासिक घडी मानली जात आहे. टेस्लाच्या शोरूममध्ये मॉडेल Y, मॉडेल 3 आणि मॉडेल X यासारख्या अत्याधुनिक इलेक्ट्रिक गाड्यांची झलक पाहायला मिळणार आहे.

टेस्ला मॉडेल Y ही कार भारतात सर्वप्रथम दाखल होणार असल्याची माहिती समोर आली आहे. चीनमधून या गाड्यांची आयात केली जाणार असल्याने त्यावर सुमारे ७०% आयात शुल्क लागणार आहे. परिणामी, या गाड्यांची भारतातील किंमत थोडी अधिक असण्याची शक्यता आहे. मात्र, टेस्ला भविष्यात भारतातच उत्पादन सुरू करण्याचा विचार करत आहे, ज्यामुळे किंमती आणखी वाजवी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शोरूमसाठी कंपनीने BKC परिसरात ४००० स्क्वेअर फूट जागा भाड्याने घेतली आहे. दरमहा साधारण ३५.२६ लाख रुपये इतकं भाडं टेस्ला कंपनी भरत असून, दरवर्षी भाड्यात ५ टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. त्यामुळे पाच वर्षांत हे भाडं जवळपास ४३ लाखांपर्यंत पोहोचेल, असा अंदाज आहे.

गाड्यांच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचं झालं, तर मॉडेल Y मध्ये Long Range RWD आणि Long Range AWD असे दोन प्रकार असून, ही कार एका पूर्ण चार्जमध्ये सुमारे ५७४ किमी अंतर पार करू शकते. केवळ ४.६ सेकंदात ० ते १०० किमी/तास वेग गाठणारी ही कार आपल्या दमदार परफॉर्मन्समुळे जगभरात लोकप्रिय ठरली आहे.

हे पण वाचा : PF काढायचंय? नवे नियम वाचा – आता फक्त OTP वर मिळणार पैसे; जाणून घ्या कसं ते?

मॉडेल 3 ही आणखी एक प्रमुख कार आहे. तिचा वेग ताशी १६२ किमी असून, ती केवळ ३ सेकंदात ० ते १०० किमीचा वेग गाठू शकते. अमेरिकेत याची किंमत जवळपास २५.९९ लाख रुपये असून, भारतात ती सुमारे २९.७९ लाख रुपये दरम्यान असू शकते.

Leave a Reply

Discover more from Punelive24

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading