October 29, 2026

घसरणीचा झटका! मार्केट रेड झोनमध्ये; आठवड्याच्या शेवटच्या दिवशी ‘या’ शेअर्सनी दिला नुकसानाचा धक्का

0
Share Market Today

Share Market Today

Share Market Today : आठवड्याच्या अखेरीस, शुक्रवारी शेअर बाजाराने रेड झोनमध्ये सुरूवात करत गुंतवणूकदारांमध्ये थोडी चिंता निर्माण केली. सलग दोन दिवसांच्या तेजीला ब्रेक लागला असून आज बाजारात सौम्य घसरण दिसून आली. सकाळी बाजार उघडताच बीएसई सेन्सेक्स ६५.६२ अंकांनी घसरून ८२,१९३.६२ वर स्थिरावला, तर एनएसई निफ्टी २५,१०८.५५ वर उघडला – म्हणजेच केवळ २.९० अंकांची घसरण.

हे पण वाचा : फक्त ₹31 मध्ये मल्टीबॅगर! ट्रायडेंट शेअरने दिला 441% परतावा

कालच्या व्यवहारात सेन्सेक्सनं ३७५ अंकांची घसरण दाखवली होती, तर निफ्टीमध्येही १०० अंकांची चढ-उतार पाहायला मिळाली होती. त्यामुळे आजची सुरुवात गुंतवणूकदारांच्या अपेक्षेप्रमाणेच सावधगिरीने झाली.

अ‍ॅक्सिस बँकेचे शेअर्स दबावात — ४.५६% ची मोठी घसरण

आजच्या व्यवहारात सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं ते अ‍ॅक्सिस बँकेच्या शेअर्सनी. सलग काही दिवस चांगली कामगिरी केल्यानंतर आज अ‍ॅक्सिस बँकेचे शेअर्स ४.५६ टक्क्यांनी घसरले. बँकेच्या आर्थिक कामगिरीबाबत चिंता व्यक्त होत असलेल्या बातम्यांमुळे गुंतवणूकदारांनी विक्रीचा मारा केल्याचं विश्लेषकांचे म्हणणं आहे.

तरीही, बाजारात पूर्णतः नकारात्मक वातावरण नाही. सेन्सेक्समधील ३० पैकी २० शेअर्स ग्रीन झोनमध्ये व्यवहार करताना दिसले. टाटा स्टीलचे शेअर्स सर्वाधिक १.१९ टक्क्यांनी वधारले, तर इन्फोसिस, रिलायन्स, टीसीएस, महिंद्रा अँड महिंद्रासारख्या ब्लू चिप शेअर्समध्येही सौम्य वाढ दिसून आली.

टेक महिंद्राचे शेअर्स मात्र कोणत्याही बदलाविना स्थिर होते. एनएसई निफ्टीमध्येही ३१ कंपन्यांचे शेअर्स ग्रीन झोनमध्ये होते, जे बाजाराच्या एकूण स्थितीबाबत थोडीशी सकारात्मक आशा निर्माण करतात.

हे पण वाचा : तुमच्या पोर्टफोलिओत आहे का ‘हा’ शेअर? 4 दिवसांत पैसे होणार दुप्पट

अ‍ॅक्सिस बँकप्रमाणेच भारती एअरटेल, कोटक महिंद्रा बँक, बजाज फायनान्स आणि स्टेट बँक ऑफ इंडियासारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्येही थोड्याफार प्रमाणात घसरण नोंदवली गेली. हे शेअर्स अनुक्रमे १ टक्क्यांपासून ०.०१ टक्क्यांपर्यंत खाली घसरले.

सध्या बाजारात जागतिक अस्थिरता, कंपनीकडून मिळणारे तिमाही निकाल, व्याजदर आणि सरकारी धोरणांवर आधारित सतत चढ-उतार सुरू आहेत. त्यामुळे छोट्या गुंतवणूकदारांनी सध्या थोडी संयमाची भूमिका घ्यावी, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातोय.

Leave a Reply