स्मार्ट इन्व्हेस्टर्ससाठी संधी? अदानी ग्रीन शेअरबाबत ब्रोकिंग फर्मकडून मोठा सल्ला
Adani Green Energy Stock
Adani Green Energy Stock : भारतीय शेअर बाजारात गुरुवारी किरकोळ घसरण पाहायला मिळाल्याने गुंतवणूकदारांमध्ये संमिश्र भावना दिसून आली. मात्र या घसरणीच्या पार्श्वभूमीवर, एका शेअरने मात्र विश्लेषकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत – आणि तो म्हणजे अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड. नामांकित जागतिक ब्रोकिंग फर्म जेफ्रीजने या कंपनीबाबत स्पष्ट ‘बुलिश’ भूमिका घेतली आहे. त्यांनी या शेअरला तब्बल 23.86% पर्यंत अपसाईड रिटर्न मिळेल, असा अंदाज व्यक्त करत ₹1,300 चा टार्गेट प्राईस निश्चित केला आहे.
हे पण वाचा : फक्त ₹31 मध्ये मल्टीबॅगर! ट्रायडेंट शेअरने दिला 441% परतावा
आज गुरुवारी (17 जुलै 2025) शेअर बाजारात ट्रेडिंगला सुरुवात झाल्यापासूनच अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर 1049.6 रुपयांवर ट्रेड करताना दिसला. दिवसभरात या शेअरने 1054.3 रुपयांचा उच्चांक गाठला, तर 1033.4 रुपयांपर्यंत घसरणही झाली. सध्या शेअरचा कल स्थिर असून गुंतवणूकदारांचा कलही सकारात्मक दिसतो.
विशेष म्हणजे, गेल्या 52 आठवड्यांत या शेअरने 2091 रुपयांपर्यंत झेप घेतली होती, तर याच कालावधीत त्याने 758 रुपयांचा नीचांक गाठला होता. म्हणजेच, हा शेअर चांगल्या झोकात वरखाली होतोय, मात्र जेफ्रीजसारख्या संस्थेचा सकारात्मक दृष्टिकोन असल्यामुळे गुंतवणूकदारांना आश्वासक संधी मिळू शकते.
या पार्श्वभूमीवर बाजारातील एकूण स्थिती बघितली, तर गुरुवारी BSE सेन्सेक्स 190.19 अंकांनी घसरून 82444.29 वर स्थिरावला, तर NSE निफ्टीने 40.40 अंकांची घसरण नोंदवून 25171.65 चा टप्पा गाठला. बँकिंग आणि IT क्षेत्रातील निर्देशांकही कमजोर वाटले. मात्र स्मॉलकॅप शेअर्समध्ये थोडीफार तेजी पाहायला मिळाली.
अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड ही कंपनी नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत असून, देशात सौर व पवनऊर्जा उत्पादनात आघाडीवर आहे. कंपनीचे भविष्यातील प्रोजेक्ट्स, ग्रीन हायड्रोजन क्षेत्रातील हालचाली, तसेच धोरणात्मक विस्तारामुळे मोठ्या ब्रोकिंग फर्म्सना या कंपनीत प्रचंड संधी दिसत आहेत.
हे पण वाचा : तुमच्या पोर्टफोलिओत आहे का ‘हा’ शेअर? 4 दिवसांत पैसे होणार दुप्पट
गुंतवणूकदारांच्या दृष्टीने पाहता, अदानी ग्रीन एनर्जीच्या वाटचालीकडे लक्ष ठेवणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. कारण, जेफ्रीजसारखी संस्था जेव्हा विशिष्ट शेअरवर ‘बुलिश’ भूमिका घेते, तेव्हा त्या मागे सखोल संशोधन व भविष्यातील आकड्यांचा स्पष्ट आढावा असतो.
