October 30, 2026

फोर्स मोटर्स शेअरमध्ये धुमाकूळ! एका दिवसात २०% उसळी, नफा वाढला १७६ कोटींवर

0
Force Motors Share Price Today

Force Motors Share Price Today

Force Motors Share Price Today : शेअर बाजारात गुरुवारी फोर्स मोटर्सने कमालीची उसळी घेतली आणि गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले. कंपनीच्या जाहीर झालेल्या पहिल्या तिमाहीच्या मजबूत आर्थिक निकालांनंतर शेअरने थेट 20 टक्क्यांनी उडी घेतली. या झपाट्याने वाढलेल्या भावाने कंपनीने बीएसईवर आपला 52 आठवड्यांचा उच्चांक गाठत 20,563 रुपयांवर झेप घेतली.

हे पण वाचा : वेदांता शेअर 450 वर ट्रेडिंग, पण टार्गेट 545+! आता खरेदीचा योग्य काळ?

बुधवारी बाजार बंद झाल्यानंतर कंपनीने जून 2025 अखेरच्या तिमाहीचे आर्थिक निकाल सादर केले. या तिमाहीत फोर्स मोटर्सने 176.33 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला. मागील वर्षी याच तिमाहीतील नफा 115.7 कोटी रुपये होता, म्हणजे तब्बल 52.3 टक्क्यांची वाढ नोंदली गेली. उत्पन्नातही भरघोस वाढ झाली असून, ते 21.9 टक्क्यांनी वाढून 2297 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

फोर्स मोटर्सच्या या निकालांनी गुंतवणूकदारांमध्ये नवचैतन्य निर्माण केलं आहे. ऑटो सेक्टरमध्ये सध्या इनपुट खर्चाचा ताण आणि ग्रामीण मागणीतील मर्यादित सुधारणा अशी स्थिती असताना फोर्स मोटर्सने दिलेला परफॉर्मन्स उद्योगासाठी सकारात्मक संकेत देतोय.

कंपनीच्या EBITDA मध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. वर्षभरापूर्वी 249 कोटी रुपयांवर असलेले EBITDA यंदा 332 कोटी रुपयांवर पोहोचले, म्हणजेच 33.3 टक्क्यांची वाढ. मार्जिनही वाढून 14.4 टक्क्यांवर गेला आहे, जो मागील वर्षी 13.2 टक्के होता. यावरून स्पष्ट होते की, कंपनीने केवळ विक्रीच वाढवली नाही, तर कार्यक्षमतेतही मोठी प्रगती केली आहे.

हे पण वाचा : गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! जिओ फायनान्शिअलवर ब्रोकिंग फर्मचा पॉझिटिव्ह रेटिंग

याच दरम्यान, कंपनीने नेतृत्व क्षेत्रातही महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. अंशुल सक्सेना यांची कॉर्पोरेट स्ट्रॅटेजीचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, ही नेमणूक 2023 जुलैपासून लागू झाली आहे. 19 वर्षांचा अनुभव असलेले सक्सेना विविध उत्पादन कंपन्यांमध्ये नेतृत्व आणि सल्लागार म्हणून कार्यरत राहिले असून, त्यांच्या नियुक्तीकडे एक दीर्घकालीन रणनीतीच्या दृष्टीने पाहिले जात आहे.

 

Leave a Reply