October 29, 2026

गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! 12 शेअर्स देणार जबरदस्त परतावा – जाणून घ्या कोणते

0
Strong Buy Stocks India

Strong Buy Stocks India

Strong Buy Stocks India : सध्या शेअर बाजारात एकत्र तेजी किंवा घसरण दिसून येत नाहीये. काही शेअर्स वधारताना दिसत असले, तरी अनेक शेअर्स स्थिर आहेत किंवा घसरणीचा सामना करत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांनी निवडक शेअर्समध्ये गुंतवणूक करावी, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. कारण सध्या बाजार “स्टॉक-स्पेसिफिक मोड”मध्ये आहे — म्हणजे संपूर्ण बाजार नाही, तर चांगली कामगिरी करणाऱ्या कंपन्यांचेच शेअर्स तेजीत आहेत.

हे पण वाचा : शेअर बाजारात मोठा धक्का! सेन्सेक्स 350 अंकांनी कोसळला, निफ्टी 25K खाली

Refinitiv च्या ‘स्टॉक रिपोर्ट प्लस’ मध्ये ET Screener ने अशा काही लार्ज कॅप आणि मिड कॅप शेअर्सची यादी जाहीर केली आहे, ज्यांना पुढील १२ महिन्यांसाठी Strong Buy किंवा Buy रेटिंग मिळाले आहे. या यादीतील कंपन्यांमध्ये ३०% ते ४६% पर्यंत संभाव्य वाढ असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. म्हणजेच, या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे.

या यादीत समाविष्ट असलेल्या काही प्रमुख कंपन्या आणि त्यांची कामगिरी पाहता त्या गुंतवणुकीसाठी आकर्षक पर्याय ठरू शकतात. उदाहरणार्थ, Transformers & Rectifiers India ही कंपनी उच्च क्षमतेच्या पॉवर ट्रान्सफॉर्मर्सची निर्मिती करते. यांच्याकडून देशांतर्गत तसेच परदेशी बाजारासाठी सुसज्ज उत्पादने तयार होतात. या कंपनीला ४६% पर्यंत वाढीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे, Cello World ही सर्वपरिचित कंपनी घरगुती वस्तू, स्टेशनरी आणि फर्निचर उत्पादन क्षेत्रात कार्यरत आहे. तिच्याकडून मिळणारे उत्पादन आणि बाजारातील विश्वास पाहता तज्ज्ञांनी यास ४१% वाढीचा अंदाज वर्तवला आहे.

हे पण वाचा : फोर्स मोटर्स शेअरमध्ये धुमाकूळ! एका दिवसात २०% उसळी, नफा वाढला १७६ कोटींवर

Finolex Cables, ITC, Ramkrishna Forgings, Bajaj Electricals, Dr. Reddy’s Labs, Havells, Maruti Suzuki यांसारख्या नावाजलेल्या कंपन्यांनाही यादीत स्थान देण्यात आले असून, यातील काही कंपन्यांचा इतिहास पाहता त्यांचा परतावा कायमच आकर्षक राहिला आहे.

विशेष म्हणजे, काही शेअर्सना Hold रेटिंग देऊन त्यांची स्थिर कामगिरी लक्षात घेण्यात आली आहे. पण Strong Buy आणि Buy रेटिंग असलेले शेअर्स — विशेषतः ज्या कंपन्यांच्या उत्पादनांमध्ये सातत्याने नवकल्पना आणि गुणवत्तेवर भर आहे — हेच सध्या गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम मानले जात आहेत.

Leave a Reply