610% रिटर्न देणारा सरकारी शेअर! तज्ज्ञांचं टार्गेट प्राईस अपडेट, अजून खरेदीची संधी?
IRFC Share Price
IRFC Share Price : शेअर बाजारात सतत बदल होत असले, तरी काही निवडक सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी अत्यंत फायदेशीर ठरत आहेत. इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (IRFC) ही अशीच एक कंपनी असून, तिचा शेअर सध्या गुंतवणूकदारांच्या रडारवर पुन्हा एकदा झळकत आहे. कारणही तसंच – गेल्या काही वर्षांत तब्बल 610 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा या शेअरने दिला आहे.
हे पण वाचा : पेनी स्टॉकमध्ये संधीच संधी! 14 रुपयांत 25% रिटर्न मिळवण्याची संधी
आज बुधवार, 23 जुलै 2025 रोजी शेअर बाजारात ट्रेडिंग सुरू होताच IRFC चा शेअर 133.71 रुपयांवर ओपन झाला. दिवसाच्या व्यवहारात या शेअरने 136.80 रुपयांचा उच्चांक गाठला, तर 133.04 रुपये इतका नीचांकी स्तर पाहिला. दुपारपर्यंत शेअर 2.66 टक्क्यांनी वधारून 134.34 रुपयांवर ट्रेड करत होता. कंपनीचं एकूण मार्केट कॅप सध्या 1.75 लाख कोटी रुपये इतकं आहे, ज्यातून तिच्या आर्थिक स्थैर्याची कल्पना करता येते.
IRFC चा हा शेअर मागील 52 आठवड्यांत 108.04 रुपयांपासून थेट 209 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. म्हणजेच, या कालावधीत गुंतवणूकदारांना अधिकचा मोठा नफा मिळवण्याची संधी होती. आता पुन्हा एकदा तज्ज्ञांनी या शेअरवर आपला विश्वास व्यक्त केला असून, टार्गेट प्राईस 160 ते 180 रुपये पर्यंत पोहोचू शकतो, असा अंदाज वर्तवला आहे.
रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या IRFC ची भूमिका रेल्वे प्रकल्पांसाठी भांडवल उभारणं ही आहे. त्यामुळे देशातील पायाभूत सुविधा विकासासोबतच या कंपनीच्या व्यवसायातही मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारनेही रेल्वे क्षेत्रासाठी मोठं बजेट जाहीर केलं असून, त्याचा थेट फायदा IRFC ला मिळत आहे.
हे पण वाचा : ‘हा’ शेअर पुन्हा झळकतोय! 387% नफा देणारा ट्रायडेंट आता 30 रुपयात
सध्या बाजारातील संमिश्र वातावरणातही IRFC सारख्या स्थिर आणि विश्वासार्ह कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदार उत्सुक आहेत. अल्पकालीन चढ-उतारांमुळे घाबरून न जाता, दीर्घकालीन दृष्टीकोनातून विचार करणाऱ्यांसाठी हा शेअर चांगला पर्याय ठरू शकतो, असं तज्ज्ञांचं मत आहे.
