November 1, 2026

पेनी स्टॉकमध्ये संधीच संधी! 14 रुपयांत 25% रिटर्न मिळवण्याची संधी

0
RattanIndia Power share

RattanIndia Power share

RattanIndia Power share : शेअर बाजारात चढ-उतार सुरू असतानाच काही स्टॉक्स गुंतवणूकदारांच्या नजरा खिळवून ठेवत आहेत. असाच एक पेनी स्टॉक म्हणजे रतन इंडिया पॉवर लिमिटेड. अवघ्या 14.71 रुपयांना उपलब्ध असलेला हा शेअर भविष्यात मोठा परतावा देऊ शकतो, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. विशेष म्हणजे, याने यापूर्वी तब्बल 540% पर्यंत परतावा दिला आहे. त्यामुळे अल्प गुंतवणूकदारांसाठी हा स्टॉक सध्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

हे पण वाचा : ‘हा’ शेअर पुन्हा झळकतोय! 387% नफा देणारा ट्रायडेंट आता 30 रुपयात

बुधवार, 23 जुलै 2025 रोजी भारतीय शेअर बाजारात सौम्य तेजी होती. बीएसई सेन्सेक्स 149.90 अंकांनी वाढून 82,336.71 वर बंद झाला, तर निफ्टी 45.10 अंकांनी वाढून 25,106 च्या पातळीवर पोहोचला. मात्र, स्मॉलकॅप आणि आयटी निर्देशांकात किरकोळ घसरण दिसून आली. अशा वातावरणात रतन इंडिया पॉवर चा शेअर काहीसा दबावाखाली आला असला, तरी दीर्घकालीन संधी शोधणाऱ्यांसाठी यामध्ये भरपूर स्कोप असल्याचे जाणकारांचे मत आहे.

आजच्या ट्रेडिंगमध्ये रतन इंडिया पॉवर लिमिटेडचा शेअर -2.58% टक्क्यांनी घसरून 14.71 रुपयांवर बंद झाला. सकाळी तो 15.20 रुपयांवर उघडला होता आणि दिवसभरात 15.25 रुपयांचा उच्चांक गाठून त्यानंतर 14.69 रुपयांपर्यंत घसरला. मागील 52 आठवड्यांमध्ये याने 8.44 रुपयांपासून 17.80 रुपयांपर्यंतची रेंज गाठली आहे. सध्या कंपनीचे मार्केट कॅप सुमारे 7,894 कोटी रुपये आहे.

विशेष म्हणजे, ब्रोकरेज तज्ज्ञांचा अंदाज आहे की पुढील काही आठवड्यांत हा शेअर 25.76% पर्यंत परतावा देऊ शकतो. अल्प दरात उपलब्ध असल्याने अनेक लघु व मध्यम गुंतवणूकदार या स्टॉककडे वळत आहेत. याआधी 540% परतावा देऊन त्याने बाजारात आपली ताकद दाखवून दिली आहे.

हे पण वाचा : ‘हा’ नवा शेअर झाला रॉकेट! ३ आठवड्यातच ८२ रुपयांवरून १५० रुपयांपर्यंत झेप

रतन इंडिया पॉवर लिमिटेड ही ऊर्जा क्षेत्रातील महत्त्वाची कंपनी असून ती मुख्यत्वे थर्मल पॉवर उत्पादनामध्ये कार्यरत आहे. सरकारच्या नव्या ऊर्जा धोरणांमुळे आणि हरित ऊर्जा प्रकल्पांमधील गुंतवणुकीच्या शक्यतांमुळे या क्षेत्रात पुन्हा एकदा गुंतवणूकदारांचा कल वाढताना दिसत आहे.

Leave a Reply