October 30, 2026

सरकारचा मोठा निर्णय! सिडको घरे आता स्वस्त होणार

0
CIDCO Housing Price

CIDCO Housing Price

CIDCO Housing Price : सिडकोच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो सर्वसामान्य नागरिकांसाठी एक दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. वाढत्या घरांच्या किमतींमुळे गृहस्वप्न फसलेल्यांना आता नव्याने आशा निर्माण झाली आहे. कारण राज्य सरकारने सिडकोच्या “माझे पसंतीचे घर” योजनेतील घरांच्या किंमती २५ ते ३० टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा विचार सुरू केल्याचे स्पष्ट झाले आहे. उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांनी विधानपरिषदेत याबाबत मोठं विधान करत सर्वसामान्यांना दिलासा दिला.

हे पण वाचा : राज्यात मुसळधार पावसाचा धोका! हवामान विभागाकडून ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

सिडकोने काही महिन्यांपूर्वी “माझे पसंतीचे घर” या योजनेंतर्गत सुमारे २६ हजार घरे लॉटरीद्वारे विक्रीसाठी उपलब्ध करून दिली होती. मात्र, अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद न मिळाल्यामुळे जवळपास निम्म्याहून अधिक घरे विक्रीविना शिल्लक राहिली आहेत. यामागे सर्वात मोठं कारण म्हणजे घरांच्या जास्तीच्या किंमती. त्यामुळेच या प्रकल्पाबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती.

विधान परिषद सदस्य विक्रांत पाटील आणि शशिकांत शिंदे यांनी याबाबत सभागृहात लक्षवेधी सूचना मांडत सिडकोच्या धोरणावर प्रश्न उपस्थित केले. यास उद्योग मंत्री डॉ. सामंत यांनी उत्तर देताना सांगितले की, “सिडको ही नफा कमावणारी संस्था नाही. ती सर्वसामान्यांसाठी काम करणारी संस्था आहे. त्यामुळेच गृहप्रकल्पातील किंमती सर्वसामान्यांना परवडतील अशा पद्धतीनेच ठरवायला हव्यात.”

सिडकोच्या घरांची किंमत कमी करण्याच्या मागणीला सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. डॉ. सामंत यांनी स्पष्ट केलं की, सिडकोला तातडीने घरांच्या किंमतींचा फेरआढावा घेण्याचे निर्देश देण्यात येणार आहेत. तसेच, घरं घेण्यासाठी आधीच पैसे भरलेले अर्जदार यामुळे वंचित राहणार नाहीत, याची हमीही त्यांनी दिली आहे. याशिवाय, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष बैठक बोलावली जाणार असून, त्यात सिडकोच्या घरांच्या धोरणावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

हे पण वाचा : आज सोनं महागलं की स्वस्त? जाणून घ्या तुमच्या शहरातील नवा दर!

एक महत्त्वाची बाब म्हणजे, योजनेत जाहीर करण्यात आलेली ३२२ चौ.फुट क्षेत्रफळाची घरे जशीच्या तशी देण्यात येतील, त्यामध्ये कोणतीही कपात केली जाणार नाही, असेही मंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे ज्या कुटुंबांनी आजवर घराच्या प्रतीक्षेत अनेक वर्षं काढली आहेत, त्यांना हा निर्णय नक्कीच सुखद ठरणार आहे.

Leave a Reply