October 30, 2026

आज सोनं महागलं की स्वस्त? जाणून घ्या तुमच्या शहरातील नवा दर!

0
Gold Price Today

Gold Price Today

Gold Price Today : काही दिवसांपासून सातत्याने चढत्या भावाने झळा सोसणाऱ्या ग्राहकांसाठी आजचा दिवस थोडीशी धक्का देणारा ठरला. कारण आज सकाळी अचानक झालेल्या घसरणीनंतर सोन्याच्या दरात जोरदार उलटफेर झाला आहे. देशभरातील प्रमुख शहरांमध्ये, विशेषतः मुंबई, पुणे, नागपूर व नाशिकसारख्या बाजारपेठांमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर १० ग्रॅमसाठी ९७,४३० रुपयांवर पोहोचला आहे, तर २२ कॅरेटसाठी तो ८९,३११ रुपयांवर स्थिरावला आहे.

हे पण वाचा : आजचा दिवस कसा असेल तुमच्यासाठी? ११ जुलैचे संपूर्ण राशीभविष्य वाचा एका क्लिकवर

या भाववाढीमुळे सामान्य ग्राहकांचा खिसा आणखी हलका होणार असल्याचं स्पष्ट आहे. नुकत्याच झालेल्या गहू, भात व इंधन दरवाढीनंतर आता लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर सोन्याचे हे उधळलेले दर सर्वसामान्यांच्या खरेदी क्षमतेला आव्हान देत आहेत. विशेषतः पुणे व मुंबईसारख्या शहरांमध्ये दागिन्यांची मागणी कायम असूनही ग्राहक प्रतीक्षा करताना दिसत आहेत.

सराफा बाजारातील जाणकार सांगतात की आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य, आणि मध्यपूर्वेतील राजकीय घडामोडी याचा थेट परिणाम भारतातील सोन्याच्या दरांवर होत आहे. आज सकाळी थोडक्याच वेळासाठी दरात घसरण झाल्याचं चित्र होतं, परंतु दुपारपर्यंत बाजाराने पुन्हा उभारी घेतली आणि भाव नव्या उच्चांकावर गेले.

सोन्याच्या शुद्धतेबाबत अनेक ग्राहकांमध्ये अजूनही गोंधळ आहे. २४ कॅरेट सोने हे ९९.९% शुद्ध असते, मात्र ते खूप मऊ असल्यामुळे त्याचे दागिने तयार करता येत नाहीत. त्यामुळे दागिन्यांमध्ये २२ कॅरेट सोने वापरले जाते, ज्यात सुमारे ९१% शुद्ध सोने आणि उरलेल्या भागात चांदी, तांबे किंवा इतर धातूंचं मिश्रण असतं. त्यामुळे दागिने खरेदी करताना २२ कॅरेटची निवड अधिक व्यवहार्य मानली जाते.

हे पण वाचा : संपत्तीप्रमाणेच आता सोशल मीडियावरही ठरवावा लागणार वारसदार? जाणून घ्या काय आहे नवं फिचर?

दरम्यान, चांदीच्या दरातसुद्धा बदल झाला आहे. १ किलो चांदीसाठी आजचा दर १,१०,५२० रुपये इतका आहे, तर १० ग्रॅमसाठी १,१०५ रुपये आकारले जात आहेत. ज्या ग्राहकांनी काही दिवसांपूर्वी खरेदी थांबवून प्रतीक्षा केली होती, त्यांना आता नव्या दरांचा धक्का बसण्याची शक्यता आहे.

Leave a Reply