29 जुलैचे राशीभविष्य: ‘या’ राशींसाठी आजचा दिवस ठरेल वादग्रस्त, नोकरीवर परिणाम?
Horoscope Today 29 July 2025
Horoscope Today 29 July 2025 : आजचं राशीभविष्य तुमचं करिअर, आरोग्य, नातेसंबंध आणि दैनंदिन व्यवहारांवर महत्त्वाचा प्रभाव टाकू शकतं. ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह-नक्षत्रांच्या हालचाली आज काही राशींसाठी विशेष आव्हानात्मक असतील, तर काहींना मोठ्या संधी मिळण्याची शक्यता आहे. विशेषत: नोकरी आणि व्यवसाय क्षेत्रात आज काही राशींना अडथळे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे काहींनी आपल्या वागणुकीत सावधगिरी बाळगणं अत्यावश्यक आहे.
हे पण वाचा : अनलिस्टेड शेअर्समध्ये अचानक ओघ; गुंतवणुकीपूर्वी ‘या’ 5 गोष्टी तपासा!
मेष राशीसाठी दिवस तणावपूर्ण ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. बोलताना शब्दांवर आणि रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे, नाहीतर आधीचे चांगले संबंधही बिघडू शकतात. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कृपेमुळे परिस्थिती काहीशी नियंत्रणात राहील.
वृषभ आणि मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसायात संधी घेऊन येतो. मित्रांच्या मदतीने नवीन उद्योग सुरू करण्याची योजना यशस्वी होऊ शकते. आर्थिक लाभाची शक्यता असून, योजनाशीर पद्धतीने पुढे गेल्यास चांगले परिणाम मिळू शकतात.
कर्क राशीच्या जातकांना नवे संपर्क आणि चांगली बातमी मिळू शकते. कार्यालयीन वातावरण अनुकूल राहील. राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना आपल्या वक्तृत्वाचा उपयोग करून प्रतिष्ठा मिळू शकते. घरातही समाधानदायक घडामोडी घडतील.
सिंह आणि कन्या राशीचे लोक आध्यात्मिकतेकडे वळलेले दिसतील. ‘कर्म ही पूजा’ या भावनेनं कामाकडे पाहिलं जाईल. कन्या राशीच्या व्यक्तींना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. मात्र, कोणतीही महत्त्वाची गोष्ट गुप्त ठेवणंच हितावह ठरेल.
तुळ राशीच्या लोकांना मानसिक अस्थैर्य जाणवू शकतं. कायदेशीर बाबतीत काळजीपूर्वक निर्णय घ्या. एखादी छोटीशी चूक आर्थिक किंवा सामाजिक त्रासदायक ठरू शकते.
वृश्चिक राशीतील लोकांनी सहकाऱ्यांशी सुसंवाद ठेवावा. कामात अडथळे येऊ शकतात. वरिष्ठांशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न करा. व्यवसायात अडथळ्यांमुळे त्रास होऊ शकतो, मात्र संयम महत्त्वाचा ठरेल.
हे पण वाचा : शेअर बाजारात सलग 4 दिवसांची घसरण; गुंतवणूकदारांचे ₹13 लाख कोटी बुडाले!
धनु आणि मकर राशीचे जातक आज सौंदर्यप्रेमात आणि सामाजिक कार्यात गुंतलेले दिसतील. धनू राशीला आज नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, तर मकर राशीचे लोक प्रलंबित काम पूर्ण करण्यात यशस्वी ठरतील. सामाजिक वर्तुळात नव्या ओळखी होतील.
कुंभ राशीसाठी आजचा दिवस कुटुंबकेंद्रित असेल. घरातील आनंद वाढेल. आवडती वस्तू खरेदी करण्याचा योग आहे. व्यवसायातील अडचणी वरिष्ठांच्या मदतीनं सुटू शकतात.
मीन राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस शांत आणि स्थिर असेल. वैयक्तिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. सामाजिक भान राखूनच पुढे जाणं हितावह ठरेल.
