October 30, 2026

29 जुलैला ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा, IMD चा यलो अलर्ट जारी!

0
Maharashtra Rain Update 29 July 2025

Maharashtra Rain Update 29 July 2025

Maharashtra Rain Update 29 July 2025 : राज्यात काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याचं चित्र असतानाच, आज 29 जुलै मंगळवारी काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने पुणे-साताऱ्याच्या घाटमाथ्यासह विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. यामुळे संबंधित भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हे पण वाचा : 29 जुलैचे राशीभविष्य: ‘या’ राशींसाठी आजचा दिवस ठरेल वादग्रस्त, नोकरीवर परिणाम?

गेल्या चोवीस तासांमध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी दमदार पाऊस झाला. विशेषतः घाटमाथ्यावरील तामिणी आणि शिरगाव येथे तब्बल 170 मिमी पावसाची नोंद झाली आहे. या भागांमध्ये धरणक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पावसाची नोंद झाल्यामुळे पाणीसाठ्यावर सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही.

आज मंगळवारी हवामान विभागाने ज्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर राहील असे सांगितले आहे, त्यामध्ये रत्नागिरी, रायगड, पुणे, सातारा (घाटमाथा भाग), तसेच विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा आणि चंद्रपूर यांचा समावेश आहे. या ठिकाणी यलो अलर्ट लागू असून जोरदार सरी आणि वीजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा : अनलिस्टेड शेअर्समध्ये अचानक ओघ; गुंतवणुकीपूर्वी ‘या’ 5 गोष्टी तपासा!

उर्वरित महाराष्ट्रात मात्र ढगाळ वातावरण राहील आणि काही ठिकाणी मधूनमधून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी नवीन पेरण्या किंवा खते टाकण्याचे काम नियोजनबद्ध पद्धतीने करावे, असा सल्ला कृषी विभागाकडून दिला जात आहे.

Leave a Reply