October 30, 2026

संपत्तीप्रमाणेच आता सोशल मीडियावरही ठरवावा लागणार वारसदार? जाणून घ्या काय आहे नवं फिचर?

0
Social Media After Death

Social Media After Death

Social Media After Death : डिजिटल युगात आपण आपलं बहुतांश आयुष्य ऑनलाईन जगतो आहोत – मग ते फोटो असोत, व्हिडीओ, पोस्ट्स, चॅट्स की वैयक्तिक आठवणी. पण एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर या सर्वांचा काय होतो? त्याच्या फेसबुक किंवा गूगल अकाउंटमध्ये असलेली माहिती, त्याचे फोटो, मेसेजेस आणि वैयक्तिक डेटा यांचं पुढे काय? याच प्रश्नाच्या उत्तरासाठी आता सोशल मीडिया कंपन्यांनी एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे – ‘डिजिटल लिगसी’, म्हणजेच डिजिटल वारसा निश्चित करण्याची सोय.

हे पण वाचा : भारतीय नोटांवर गांधीजींचाच फोटो का? RBI ने अखेर उघड केल खरं कारणं!

पूर्वी संपत्ती, बँक खाती, जमीनजुमला यासाठी कायदेशीर वारस ठरवला जात असे. पण आता, डिजिटल संपत्तीचं महत्त्व वाढल्यामुळे, सोशल मीडियासाठीसुद्धा असा वारसदार आधीच ठरवणं गरजेचं बनलं आहे. अन्यथा, मृत व्यक्तीच्या सोशल मिडिया अकाउंटमध्ये अडकलेल्या आठवणी कायमचं हरवू शकतात किंवा सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

फेसबुकवर ‘Legacy Contact’ ही सुविधा

फेसबुकने यामध्ये आघाडी घेतली आहे. वापरकर्त्यांना त्यांच्या खात्यासाठी एक विशिष्ट व्यक्ती ‘Legacy Contact’ म्हणून निवडण्याची परवानगी दिली जाते. ही निवडलेली व्यक्ती तुमच्या मृत्यूनंतर तुमचं अकाउंट मर्यादित स्वरूपात चालवू शकते – उदाहरणार्थ, श्रद्धांजलीसाठी पोस्ट टाकणे, प्रोफाइल फोटो बदलणे, नव्या फ्रेंड रिक्वेस्ट्स स्वीकारणे इत्यादी.

सेटिंग्समध्ये जाऊन ‘Memorialization Settings’ आणि त्यानंतर ‘Choose Legacy Contact’ या पर्यायाचा वापर करून ही नियुक्ती करता येते. यामुळे तुमचं अकाउंट बंद न होता, ते सन्मानपूर्वक सुरक्षित राहू शकतं.

गुगलचं ‘Inactive Account Manager’ टूल

गुगलने देखील ‘Inactive Account Manager’ नावाचं टूल दिलं आहे. जर वापरकर्ता काही काळासाठी निष्क्रिय राहिला, तर त्याच्या डेटाचं पुढे काय होणार – ते डिलीट करायचं, की कोणाला देण्याची परवानगी द्यायची – हे आधीच ठरवता येतं. यातून तुमचं Gmail, YouTube, Google Photos सारख्या सेवांतील डेटा सुरक्षितपणे तुमच्या विश्वासार्ह व्यक्तीकडे दिला जाऊ शकतो.

इन्स्टाग्राममध्ये मर्यादित सुविधा

सध्या इन्स्टाग्रामवर अशी Legacy Contact निवडण्याची सोय नाही. मात्र, नातेवाईक मृत्यू प्रमाणपत्र सादर करून त्या अकाउंटला ‘Memorialized’ स्वरूप देऊ शकतात. त्यामुळे अकाउंटवर ‘Remembering’ असा टॅग दिसतो, परंतु कोणीही लॉगिन करून ते वापरू शकत नाही.

हे पण वाचा : अभिनेत्री प्रियांका चोप्राने घेतला ‘हा’ मोठा निर्णय; चाहत्यांसाठी मोठा खुलासा

डिजिटल वारसा का गरजेचा आहे?

आपली ऑनलाईन उपस्थिती म्हणजेच डिजिटल अस्तित्व, आता केवळ माहितीपुरती मर्यादित नाही. त्यामागे आठवणी, नातेसंबंध, संवाद, अनुभव आणि वैयक्तिक ओळख दडलेली असते. एखाद्याच्या मृत्यूनंतर या गोष्टींना सुरक्षित ठेवणं हे तितकंच महत्त्वाचं ठरतं. त्यामुळे डिजिटल लिगसीची निवड ही केवळ तांत्रिक नाही, तर भावनिकदृष्ट्याही महत्त्वाची ठरते.

 

Leave a Reply