October 30, 2026

भारतरत्न JRD टाटा गुणवंत संशोधक शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज सुरू, जाणून घ्या अधिक

0
Punelive24 (40)

JRD Tata PhD Scholarship | संशोधनात गुणवत्ता वाढावी आणि आर्थिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये, यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Savitribai Phule Pune University) तर्फे ‘भारतरत्न जे. आर. डी. टाटा अर्थसाह्य योजना’ राबवली जाते. 2018 मध्ये सुरू झालेल्या या योजनेचे नाव गेल्या वर्षी बदलण्यात आले असून, याअंतर्गत पीएचडी (Ph.D) करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना तीन वर्षांसाठी आर्थिक मदत दिली जाते.

पात्रता आणि निकष काय असणार?

या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू असून अंतिम मुदत 21 एप्रिल 2025 आहे. 31 ऑगस्ट 2021 ते 21 एप्रिल 2025 या कालावधीत पीएचडीसाठी नोंदणी केलेले विद्यार्थी अर्ज करू शकतात. पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) शैक्षणिक विभागांमध्ये पीएचडी करणाऱ्या 100 विद्यार्थ्यांना आणि विद्यापीठाशी संलग्न संशोधन केंद्रांतील प्रत्येकी दोन विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार असून निवडलेल्या विद्यार्थ्यांचे तीन वर्षांचे शैक्षणिक शुल्क विद्यापीठाकडून भरण्यात येईल.

शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी काही आवश्यक निकष आहेत. अर्जदाराने प्राप्तिकर रिटर्न फॉर्म नंबर 16 किंवा कर भरल्याची पावती सादर करणे आवश्यक आहे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखांपेक्षा जास्त नसल्याचा तहसिलदाराचा अधिकृत दाखला लागेल. विद्यार्थ्याने इतर कोणतीही शिष्यवृत्ती घेतलेली नसावी. तसेच, जर पीएचडीचा अभ्यासक्रम अर्धवट सोडला किंवा पूर्णवेळ किंवा अर्धवेळ नोकरी पत्करली, तर अर्थसाह्याची रक्कम परत करावी लागेल.

विद्यार्थ्यांची किमान 75 टक्के हजेरी असणे आवश्यक आहे आणि ती बायोमेट्रिक पद्धतीने प्रमाणित करावी लागेल. तसेच, विद्यार्थ्याने आपल्या पीएचडी नोंदणीच्या तारखेपासून उपस्थितीबाबत प्रमाणपत्र विद्यापीठाला सादर करणे बंधनकारक राहील. विद्यार्थ्यांना सहा महिन्यांनी संशोधन प्रगती अहवाल सादर करावा लागेल, अन्यथा शिष्यवृत्तीचा लाभ बंद होऊ शकतो.

मंदिर व्यवस्थापन अभ्यासक्रमही सुरू होणार

दरम्यान, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Savitribai Phule Pune University) च्या नाशिक (Nashik) उपकेंद्रात ‘फाउंडेशन ऑफ टेम्पल मॅनेजमेंट’ अर्थात मंदिर व्यवस्थापन अभ्यासक्रम देखील सुरू करण्यात येणार आहे. हा सहा महिन्यांचा विशेष अभ्यासक्रम असून, यासाठी 60 जागा उपलब्ध आहेत. अर्ज प्रक्रिया 7 एप्रिलपासून सुरू होईल आणि 1 जुलैपासून हा अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे.

Leave a Reply