भारताच्या टॉप 10 श्रीमंतांची यादी जाहीर! भारतात अंबानी नंबर 1, बाकी टॉप 10 कोण?
India Richest People 2025
India Richest People 2025 : फोर्ब्सने नुकतीच २०२५ साठी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केली आणि नेहमीप्रमाणेच भारतातही या यादीची उत्सुकता होती. विशेषतः, भारतातील टॉप अब्जाधीश कोण आहेत, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या यादीत पुन्हा एकदा रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी पहिलं स्थान पटकावलं आहे. त्यांची एकूण संपत्ती सध्या जवळपास $116 अब्ज म्हणजेच तब्बल ₹9.5 लाख कोटी रुपये आहे. यामुळे अंबानी हे केवळ भारताचेच नव्हे तर संपूर्ण आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.
हे पण वाचा : पुण्यात फिरायला जाण्याचा प्लॅन आहे? मग ‘या’ प्रसिद्ध ठिकाणांना चुकूनही विसरू नका!
मुकेश अंबानी यांनी गेल्या काही दशकांत दूरसंचार, ऊर्जा, रिटेल आणि डिजीटल क्षेत्रात मोठी गुंतवणूक करून रिलायन्सला एका वेगळ्याच उंचीवर नेले आहे. जिओच्या माध्यमातून देशभरात इंटरनेट क्रांती आणली आणि रिटेलच्या माध्यमातून लाखो ग्राहकांच्या जीवनशैलीत बदल घडवून आणला. त्यामुळे त्यांची ही यशोगाथा भारताच्या आर्थिक प्रगतीचा एक महत्त्वाचा भाग बनली आहे.
दुसऱ्या क्रमांकावर आहेत गौतम अदानी, ज्यांची संपत्ती अंदाजे $84 अब्ज आहे. अदानी ग्रुपने ऊर्जा, लॉजिस्टिक्स, बंदर, विमानतळ, खनिज इत्यादी क्षेत्रात वेगाने विस्तार केला आहे. काही वादग्रस्त काळ आणि शेअर बाजारातील चढ-उतारांनंतरही त्यांची आर्थिक ताकद टिकून आहे. ते अजूनही भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यावसायिक आहेत.
तिसऱ्या क्रमांकावर एचसीएल टेक्नॉलॉजीजचे संस्थापक शिव नाडर आहेत. तंत्रज्ञान क्षेत्रातील या दिग्गजाची संपत्ती सध्या $36.9 अब्ज आहे. त्यांनी भारतीय आयटी उद्योगाला जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी मोलाचं योगदान दिलं आहे.
चौथ्या स्थानावर सावित्री जिंदाल या एकमेव महिला उद्योजिका आहेत. त्यांची संपत्ती $33.5 अब्ज इतकी असून त्यांनी जिंदाल समूहाच्या माध्यमातून स्टील उद्योगात वेगळा ठसा उमटवला आहे. त्या भारतातील सर्वात श्रीमंत महिला असून देशातील औद्योगिक विकासात त्यांचा मोलाचा वाटा आहे.
हे पण वाचा : लाडकी बहिण योजनेतून हजारो महिलांची नावे वगळली! तुमचं नाव अजून आहे का? लगेच तपासा
भारतातील टॉप १० श्रीमंतांमध्ये पुढील व्यक्तींचा समावेश आहे –
दिलीप शांगवी (सन फार्मा), सायरस पूनावाला (सेरम इन्स्टिट्यूट), कुशल पाल सिंग (डीएलएफ), कुमार मंगलम बिर्ला (आदित्य बिर्ला ग्रुप), राधाकिशन दमानी (डीमार्ट), आणि लक्ष्मी मित्तल (आर्सेलर मित्तल).
या सर्व उद्योगपतींच्या यशामागे दशकांतील मेहनत, दूरदृष्टी आणि धोरणात्मक निर्णय आहेत. त्यांच्या या प्रगतीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळत आहे. विशेषतः औषध, तंत्रज्ञान, रिटेल, स्टील आणि रिअल इस्टेटसारख्या क्षेत्रांमध्ये भारताची जागतिक स्पर्धेतली स्थिती अधिक बळकट झाली आहे.
