4000 कोटींचा NSDL IPO उघडला, शेअर घ्यावा का टाळावा? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत
NSDL IPO
NSDL IPO : देशातील सर्वात मोठ्या डिपॉझिटरी कंपन्यांपैकी एक असलेल्या नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड अर्थात NSDL चा बहुप्रतीक्षित आयपीओ आज, ३० जुलैपासून उघडला आहे. या इश्यूची एकूण किंमत ४,३२६ कोटी रुपयांच्या घरात असून, गुंतवणूकदार व बाजार विश्लेषक यांच्यात सध्या या IPO विषयी चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे.
हे पण वाचा : फक्त 86 रुपयांचा सरकारी शेअर देतोय 35% परतावा, जाणून घ्या ब्रोकर्सचं टार्गेट
या आयपीओतून कंपनी नवीन शेअर्स जारी करत नाही, तर हा पूर्णपणे ऑफर फॉर सेल स्वरूपात आहे. म्हणजेच, विद्यमान भागधारक आपला हिस्सा विकून बाहेर पडणार असून, त्यांना आपल्या मूळ गुंतवणुकीवर तब्बल ४०० पट परतावा मिळणार आहे. हे शेअर्स विकून मिळणारा निधी कंपनीकडे न जाता थेट प्रमोटर्सच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी या मुद्द्यावर विशेष लक्ष देणे गरजेचे ठरते.
NSDL ने शेअरप्रति किंमत ₹७६० ते ₹८०० या पट्ट्यात ठेवली आहे. एका लॉटमध्ये १८ शेअर्स असून, गुंतवणूकदाराला किमान ₹१४,४०० गुंतवावे लागतील. गुंतवणुकीपूर्वी विचार करायला हवा की, कंपनीचा महसूल थेट शेअर बाजारातील हालचालींवर अवलंबून असतो, त्यामुळे बाजारातील चढ-उतारांचा प्रभाव थेट आर्थिक परिणाम घडवू शकतो.
IPO उघडण्यापूर्वीच कंपनीने अँकर गुंतवणूकदारांकडून ₹१,२०१ कोटी उभारले आहेत. यामध्ये एलआयसी आणि अबूधाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटीसारख्या प्रतिष्ठित संस्थांचा सहभाग आहे. यामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढतो. NSDL भारतातील दोन प्रमुख डिपॉझिटरींपैकी एक असून, दुसरी कंपनी म्हणजे CDSL. सध्या दोघांमध्ये चुरस असल्याचे ब्रोकरेज संस्थांचे मत आहे.
हे पण वाचा : सरकारी NHPC शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा बुलिश सल्ला
विशेष म्हणजे भारतात अजूनही केवळ १३.४ टक्के लोकसंख्येकडेच डिमॅट खाती आहेत. म्हणजेच या क्षेत्रात अजून प्रचंड वाढीची संधी उपलब्ध आहे. ब्रोकरेज संस्था आनंद राठी, एंजल वन आणि बजाज ब्रोकिंग या तिन्ही संस्थांनी या IPO ला दीर्घ मुदतीसाठी गुंतवणुकीसाठी योग्य संधी असल्याचे सांगितले आहे. त्यांनी यामध्ये सबस्क्राईब करण्याचा सल्ला दिला असून, सध्याच्या किंमतीचे मूल्यांकन बाजारातील प्रतिस्पर्ध्याच्या तुलनेत तुलनेने वाजवी असल्याचे मत मांडले आहे.
