रतन इंडिया पॉवर शेअर पुन्हा तेजीत! मल्टिबॅगर परतावा देणारा 15 रुपयांचा शेअर पुन्हा चर्चेत
RattanIndia Power Share
RattanIndia Power Share : शेअर बाजारात हलकासा अस्वस्थतेचा सूर असताना, काही पेनी स्टॉक्स मात्र गुंतवणूकदारांच्या नजरा खेचत आहेत. त्यातच रतन इंडिया पॉवर लिमिटेड या कंपन्याचा शेअर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. कारणही तसंच आहे – अवघ्या १५ रुपयांच्या घरात ट्रेड होणारा हा शेअर मागील काळात गुंतवणूकदारांना ५८९ टक्केपर्यंतचा जबरदस्त परतावा देत आला आहे.
हे पण वाचा : अदानी ग्रुपचा हा शेअर पुन्हा चर्चेत! तज्ज्ञांचं BUY सिग्नल आणि मोठा अपसाईड टार्गेट
शुक्रवारी, 18 जुलै 2025 रोजी बाजारात सेन्सेक्स 501 अंकांनी घसरून 81,757.73 वर स्थिरावला. निफ्टीदेखील 143 अंकांची घसरण नोंदवत 24,968.40 वर बंद झाला. या घसरणीच्या पार्श्वभूमीवरही रतन इंडिया पॉवर कंपनीचा शेअर मात्र 1.37% वधारून 15.3 रुपयांवर बंद झाला. त्याच दिवशी त्याने 15.43 रुपयांचा उच्चांक गाठला, तर किमान स्तर होता 14.92 रुपये.
या शेअरची 52 आठवड्यांची उच्चतम किंमत 17.80 रुपये असून नीचांकी पातळी 8.44 रुपये इतकी होती. म्हणजेच एका वर्षातच त्याने जवळपास दुप्पट झेप घेतली. सध्या या कंपनीचे एकूण मार्केट कॅप ₹8,146 कोटी इतके आहे – जे पेनी स्टॉकच्या श्रेणीत असूनही लक्षणीय मानले जाते.
रतन इंडिया पॉवर लिमिटेड ही कंपनी ऊर्जा क्षेत्रात काम करते आणि विशेषतः थर्मल पॉवर प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करते. काही काळ अडचणीत गेलेल्या या कंपनीने मागील दोन वर्षांमध्ये अनेक व्यावसायिक निर्णय घेत, आपला आर्थिक गाडा योग्य रुळावर आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे अनेक ब्रोकरेज आणि तज्ज्ञांनी या स्टॉककडे ‘स्पेक्युलेटिव्ह’ पण हाय रिस्क – हाय रिटर्न अशा दृष्टीने पाहायला सुरुवात केली आहे.
हे पण वाचा : गुंतवणूकदार मालामाल! अपोलो मायक्रो सिस्टीम्सने दिला 1397% परतावा – पुढचं टार्गेट काय?
या शेअरचे ताजे टार्गेट अनेक विश्लेषकांनी 18 ते 20 रुपयांपर्यंत ठरवले आहे. अर्थात, पेनी स्टॉक्समध्ये गुंतवणूक करताना जोखीम मोठी असते, हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. पण जोखीम घेण्याची तयारी असलेल्या अल्पमुदतीच्या ट्रेडर्ससाठी रतन इंडिया पॉवर एक चांगला पर्याय ठरू शकतो, असं मत काही बाजारतज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.
