October 31, 2026

RVNL शेअरमध्ये तेजीची शक्यता! 639 रुपयांचा टार्गेट, मार्केटमध्ये खळबळ

0
RVNL Share Price

RVNL Share Price

RVNL Share Price : भारतीय शेअर बाजारात आज, शुक्रवार 18 जुलै 2025 रोजी मोठी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स तब्बल 578 अंकांनी घसरून 81,681.24 वर बंद झाला, तर निफ्टीही 169.80 अंकांनी खाली येऊन 24,941.65 वर स्थिरावला. अशा अस्थिर वातावरणातही रेल्वे क्षेत्रातील प्रमुख सरकारी कंपनी रेल विकास निगम लिमिटेड (RVNL) याच्या शेअरने गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले आहे.

हे पण वाचा : Q1 निकाल आज: रिलायन्स, बंधन बँक, हिंदुस्तान झिंकसह अनेक दिग्गज रडारवर!

आज आरव्हीएनएलचा शेअर 377.45 रुपयांवर ट्रेड करताना दिसला. दिवसाची सुरुवात 381.50 रुपयांवर झाली होती, तर दिवसातील उच्चांक 382.60 रुपये आणि नीचांकी पातळी 376.70 रुपये होती. म्हणजेच अत्यंत मर्यादित रेंजमध्ये व्यवहार झाला, मात्र तांत्रिक विश्लेषक आणि ब्रोकिंग संस्थांना या शेअरमध्ये दीर्घकालीन संधी दिसत आहेत.

RVNL हा भारत सरकारचा उपक्रम असून, रेल्वे प्रकल्पांची अंमलबजावणी, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, सिग्नलिंग, ट्रॅक अपग्रेडेशन यांसारख्या महत्त्वाच्या कामांमध्ये कंपनी कार्यरत आहे. सरकारच्या मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांत सहभागी असणारी ही कंपनी गेल्या काही वर्षांत वेगाने वाढत आहे.

ब्रोकरेज फर्म्सचा अंदाज
प्रसिद्ध ब्रोकरेज हाउसेसनी आरव्हीएनएलबाबत आशावादी मत नोंदवत टार्गेट प्राईस जाहीर केले आहेत. काही संस्थांनी येत्या काही महिन्यांत या शेअरला 460-500 रुपयांपर्यंतचा टप्पा गाठण्याची शक्यता वर्तवली आहे. यामागे कंपनीचे मजबूत ऑर्डर बुक, सरकारकडून रेल्वे विकासावर असलेला भर आणि वाढता नफा हे मुख्य घटक आहेत.

सध्या आरव्हीएनएलचे मार्केट कॅप ₹78,720 कोटींच्या घरात आहे. मागील 52 आठवड्यांत शेअरने 305 रुपयांपासून 639 रुपयांपर्यंत झेप घेतली आहे, म्हणजेच सुमारे दुपटीहून अधिक वाढ. मात्र सध्या शेअर पूर्वीच्या उच्चांकाच्या तुलनेत कमी पातळीवर असल्यामुळे गुंतवणुकीसाठी चांगली संधी मिळू शकते, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

हे पण वाचा : 760 रुपयांवर ट्रेड होत असलेला टाटा ग्रुपचा हा शेअर 960 चा टार्गेट हिट करणार?

कंपनीची साखळी भक्कम असून, देशातील अनेक प्रादेशिक व राष्ट्रीय पातळीवरील प्रकल्पांमध्ये RVNL चा वाटा आहे. रेल्वे मंत्रालयाकडून मिळणारे नविन कंत्राटं, इतर एजन्सींशी भागीदारी आणि PPP (Public-Private Partnership) प्रकल्पांमधील सहभाग यामुळे कंपनीच्या कमाईत सातत्याने वाढ होत आहे.

Leave a Reply