October 31, 2026

डिफेन्स कंपनीचा शेअर गुंतवणूकदारांना करणार मालामाल! जानून घ्या HAL चे भविष्य

0
HAL Share Price

HAL Share Price

HAL Share Price : शेअर बाजारात मोठ्या घसरणीचे वातावरण असतानाही डिफेन्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) चा शेअर गुंतवणूकदारांचं लक्ष वेधून घेत आहे. देशात संरक्षण खर्चात होत असलेल्या वाढीमुळे आणि सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ धोरणाला मिळालेल्या गतीमुळे HAL सारख्या कंपन्यांना दीर्घकालीन फायदा होणार, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

हे पण वाचा : Q1 निकाल आज: रिलायन्स, बंधन बँक, हिंदुस्तान झिंकसह अनेक दिग्गज रडारवर!

गेल्या काही दिवसांत बाजारात अस्थिरतेचं चित्र असूनही HAL शेअरने आपली दमदार उपस्थिती दाखवली आहे. आज, 18 जुलै 2025 रोजी, हा शेअर सुमारे 1.82% घसरून 4,703.90 रुपयांवर बंद झाला. तरीही गुंतवणूकदारांचा उत्साह कायम आहे, कारण अनेक ब्रोकरेज फर्म्सनी या शेअरबाबत बुलिश धोरण घेतलं आहे आणि आकर्षक टार्गेट प्राईस जाहीर केले आहेत.

HAL चा शेअर आज 4804.80 रुपयांवर उघडला होता आणि 4,808.90 रुपयांपर्यंत गेला. दिवसाचा नीचांक होता 4,686.20 रुपये. गेल्या 52 आठवड्यांत या स्टॉकने 5,325 रुपयांपर्यंत उच्चांक गाठला आहे, तर नीचांक होता 3,046.05 रुपये. सध्या या कंपनीचं मार्केट कॅप जवळपास 3.14 लाख कोटी रुपयांवर पोहोचलं आहे, जे तिच्या स्थैर्याचं आणि बाजारातील विश्वासाचं प्रतीक मानलं जातं.

HAL च्या वाढीमागे काही ठोस कारणं आहेत.
संरक्षण क्षेत्रातील सरकारचा भर
स्वदेशी उत्पादनांवरील भर
निर्यातीत वाढती संधी
कंपनीच्या ऑर्डर बुकमधील वाढ

हे पण वाचा : 760 रुपयांवर ट्रेड होत असलेला टाटा ग्रुपचा हा शेअर 960 चा टार्गेट हिट करणार?

या पार्श्वभूमीवर अनेक ब्रोकरेज संस्थांनी HAL चा टार्गेट प्राईस 5,300 ते 5,600 रुपयांदरम्यान दिला आहे. काही संस्थांनी पुढील 12 महिन्यांत 20% पर्यंत अपसाईडची शक्यता व्यक्त केली आहे.

विशेष म्हणजे, सरकारकडून लवकरच काही मोठ्या डिफेन्स प्रोजेक्ट्सना मंजुरी मिळण्याची शक्यता असून, त्याचा थेट फायदा HAL ला होणार आहे. तसेच, कंपनीने अलीकडेच काही महत्त्वाचे प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर आणले आहेत, जे तिच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ करू शकतात.

Leave a Reply