October 31, 2026

325 रुपयांचा शेअर झाला केवळ 3 रुपयांचा; अदानी ग्रुपला खरेदीची संधी!

0
Adani JAL Acquisition News

Adani JAL Acquisition News

Adani JAL Acquisition News : कधी काळी ३२५ रुपयांवर ट्रेड करणारा जयप्रकाश असोसिएट्स लिमिटेड (JAL) चा शेअर सध्या अवघ्या ३ रुपयांवर स्थिरावलेला आहे. कंपनीला हजारो कोटींचं कर्ज असून, सध्या ती दिवाळखोरीच्या प्रक्रियेत आहे. मात्र या संकटातही एका मोठ्या औद्योगिक समुहाने संधी पाहिली आहे – तो म्हणजे गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूह.

हे पण वाचा : पुण्यात २४ कॅरेट सोन्याचा दर गगनाला भिडला; आजचे दर पाहून खिशाला लागेल चटका

अदानी ग्रुपने जयप्रकाश असोसिएट्सच्या अधिग्रहणासाठी भारतीय स्पर्धा आयोगाकडे (CCI) परवानगी मागितली आहे. कंपनीने बिनशर्त प्रस्ताव देत ही मालमत्ता ताब्यात घेण्याची तयारी दर्शवली आहे. यामुळेच बाजारात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे की, इतक्या मोठ्या आर्थिक संकटात गेलेल्या कंपनीत अदानींना नेमकं काय दिसलं?

जयप्रकाश असोसिएट्स एक बहुक्षेत्रीय पायाभूत सुविधा समूह आहे. कंपनीचं कामकाज सिमेंट, ऊर्जा, बांधकाम, स्थावर मालमत्ता आणि हॉटेल क्षेत्रात होतं. उत्तर भारतात विशेषतः नोएडा आणि ग्रेटर नोएडामध्ये कंपनीचे मोठे रिअल इस्टेट प्रकल्प असून दिल्ली, मसुरी, आग्रा येथे हॉटेल मालमत्ताही आहेत. मात्र वित्तीय अडचणींमुळे कंपनीची स्थिती पूर्णपणे ढासळली आणि अखेर जून २०२४ मध्ये NCLT च्या आदेशानंतर दिवाळखोरी प्रक्रियेत सामील करण्यात आलं.

या कंपनीवर स्टेट बँक ऑफ इंडिया आघाडीच्या बँकांचा तब्बल ५७,१८५ कोटींचा कर्जदावा आहे. हे कर्ज फेडण्यात कंपनी अपयशी ठरली. परिणामी, कर्जदार गटाने कंपनीची मालमत्ता विकण्यासाठी दिवाळखोरी मार्ग स्वीकारला.

अधिग्रहणाच्या स्पर्धेत अदानींव्यतिरिक्त वेदांता ग्रुप, डालमिया भारत सिमेंट, जिंदल पॉवर आणि PNC इन्फ्राटेक अशा चार मोठ्या कंपन्याही सामील आहेत. यामध्ये अदानी ग्रुप आघाडीवर असून त्यांनी बिनशर्त प्रस्ताव दिल्याने त्यांच्याच बाजूला वजन अधिक आहे.

हे पण वाचा : राज्यात पावसाचे पुनरागमन! ‘या’ भागात मुसळधार पावसाचा इशारा, हवामान खात्याचा अलर्ट

जयप्रकाश असोसिएट्सची उपकंपनी जयपी इन्फ्राटेक आधीच दिवाळखोरी प्रक्रियेतून मुंबईस्थित सुरक्षा ग्रुपने घेतली आहे. आता जवळपास २०,००० अपूर्ण फ्लॅट्सचा बोजा त्यांच्यावर आहे. अशातच JAL च्या अधिग्रहणासाठी अदानी ग्रुपची इच्छा म्हणजे पायाभूत सुविधांमध्ये अधिक मजबूत पकड निर्माण करण्याचा एक भाग असू शकतो.

Leave a Reply