October 29, 2026

राज्यात पावसाचे पुनरागमन! ‘या’ भागात मुसळधार पावसाचा इशारा, हवामान खात्याचा अलर्ट

0
Maharashtra Rain Alert 23 July 2025

Maharashtra Rain Alert 23 July 2025

Maharashtra Rain Alert 23 July 2025 : राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने अनेक भागांत उकाड्याने हैराण झालेल्या जनतेला दिलासा देणारी बातमी आहे. हवामान खात्याने 23 जुलै बुधवारपासून राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली असून काही भागांत मुसळधार तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह सरी कोसळणार आहेत.

हे पण वाचा : आज कोणाला मिळणार नवी संधी? कोणी सावध राहावं? जाणून घ्या तुमचं आजचं भविष्य

हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, कोकण व घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाची शक्यता असून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक घाटमाथा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून येलो अलर्ट दिला आहे. तसेच, नंदुरबार, धुळे, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांत विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

पावसाच्या विश्रांतीनंतर वाढलेल्या उकाड्यामुळे विदर्भातील नागरिक त्रस्त झाले होते. काल मंगळवारी अकोल्यात कमाल तापमान 35.7 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले, जे राज्यातील सर्वाधिक तापमान होते. मात्र हवामानातील बदलांमुळे लवकरच या उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

या पावसाच्या शक्यतेमागे काही महत्त्वाचे वातावरणीय घटक कार्यरत आहेत. आंध्रप्रदेश आणि दक्षिण ओडिशा किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. याशिवाय, बंगालच्या उपसागरात ‘विफा’ चक्रीवादळाचे उरलेले प्रभाव आणि कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू आहे. मान्सूनचा पट्टा दक्षिणेकडे सरकला असून सध्या तो राजस्थानपासून ईशान्य बंगालपर्यंत सक्रीय आहे. यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे.

काल सकाळपर्यंतच्या २४ तासांत मुंबई, कोकण व मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मध्यम ते जोरदार पावसाची नोंद झाली. पूर्व विदर्भात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला.

हे पण वाचा : शेअर बाजार झपाट्याने तेजीत! सेन्सेक्स 265 आणि निफ्टी 25,100 पार – गुंतवणूकदार उत्साही

राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. अनेक भागांमध्ये खरिपाच्या पेरण्या रखडल्या होत्या, त्यामुळे हा पाऊस पीक विकासासाठी निर्णायक ठरेल. मात्र काही भागांत मुसळधार पावसामुळे ढगफुटीची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे प्रशासन आणि नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply