आता विकायचा की खरेदी करायचा? टाटा मोटर्स शेअरसाठी ब्रोकरेजचा मोठा अंदाज
Tata Motors Share Price
Tata Motors Share Price : देशातील अग्रगण्य वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्सच्या शेअर्सबाबत पुन्हा एकदा बाजारात उत्साहाचं वातावरण आहे. भलेही आजच्या व्यवहारात टाटा मोटर्सचा शेअर किंचित घसरलेला असला, तरी मोठ्या ब्रोकरेज हाऊसेसकडून या शेअरबाबत “बुलिश” मत व्यक्त केलं जात आहे. त्यानुसार, येत्या काही महिन्यांत टाटा मोटर्सचा शेअर तब्बल 33 टक्क्यांनी वर जाऊ शकतो, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
हे पण वाचा : Zomato चा धमाका! शेअर्समध्ये 13% उसळी, नवीन उच्चांक गाठला
आज मंगळवार, 22 जुलै 2025 रोजी शेअर बाजार उघडल्यानंतर टाटा मोटर्सचा शेअर 688 रुपयांवर उघडला होता. दिवसातील उच्चांक 688.85 रुपये तर नीचांकी स्तर 675.20 रुपये इतका होता. दिवसभराच्या व्यवहारात हा शेअर सुमारे 1.66% टक्क्यांनी घसरून 676.2 रुपयांवर स्थिरावला. मात्र, तांत्रिक विश्लेषण आणि मूलभूत आर्थिक स्थिती पाहता, मोठ्या गुंतवणूकदारांना हा शेअर अजूनही आकर्षक वाटतोय.
टाटा मोटर्सच्या शेअरने गेल्या ५२ आठवड्यांत 1179 रुपयांचा उच्चांक गाठला आहे, तर त्याच कालावधीत 535.75 रुपयांचा नीचांक पाहिला आहे. सध्या कंपनीचं मार्केट कॅप जवळपास 2.49 लाख कोटी रुपयांवर आहे. एवढ्या प्रचंड व्हॅल्यूएशन असूनही, गुंतवणूकदारांचा या शेअरवरील विश्वास कायम आहे.
ब्रोकरेज संस्थांकडून या शेअरच्या वाढीचा अंदाज का?
टाटा मोटर्सची कमर्शियल आणि पॅसेंजर वाहन क्षेत्रातील पकड भक्कम आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारात टाटा मोटर्सचा वाटा झपाट्याने वाढतोय. टियागो EV, नेक्सॉन EV यासारख्या गाड्यांना जबरदस्त प्रतिसाद मिळतोय. कंपनीकडे EV उत्पादनाच्या स्पष्ट योजना, मजबूत सप्लाय चेन आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील विस्तार योजनांचा भर आहे.
हे पण वाचा : Jhunjhunwala पोर्टफोलिओतील ‘हे’ शेअर्स देतील जबरदस्त परतावा; ब्रोकरेजचा मोठा दावा
त्याचबरोबर, कंपनीने अलीकडेच जाहीर केलेले आर्थिक निकालही उत्साहवर्धक होते. मजबूत महसूल, खर्चावर नियंत्रण, आणि उत्तम मार्जिनमुळे आगामी तिमाहीतही कंपनीची कामगिरी चांगली राहील, असा तज्ज्ञांचा विश्वास आहे.
