Jhunjhunwala पोर्टफोलिओतील ‘हे’ शेअर्स देतील जबरदस्त परतावा; ब्रोकरेजचा मोठा दावा
Rakesh Jhunjhunwala Stocks
Rakesh Jhunjhunwala Stocks : भारतीय शेअर बाजारातील प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचे नाव आजही चर्चेत असते. त्यांच्या निधनानंतरही त्यांचा पोर्टफोलिओ आणि त्यातील शेअर्स गुंतवणूकदारांमध्ये विशेष आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहेत. रेखा झुनझुनवाला या त्यांच्या पत्नी असून, त्यांच्याही शेअरधारणा मोठ्या कंपन्यांमध्ये असल्याने अनेक रिटेल गुंतवणूकदार त्यांच्या पोर्टफोलिओकडे बारकाईने पाहत असतात. याच पार्श्वभूमीवर मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज संस्थेने त्यांच्या पोर्टफोलिओतील तीन महत्वाच्या शेअर्सवर लक्ष केंद्रित करत त्यामध्ये गुंतवणुकीचा स्पष्ट सल्ला दिला आहे.
हे पण वाचा : हा रेल्वे शेअर होणार मल्टीबॅगर? तज्ज्ञ सांगतात – आता घ्या, 27 टक्के रिटर्न मिळेल!
या तिन्ही कंपन्यांमध्ये मजबूत व्यवसाय मॉडेल, स्थिर आर्थिक वाढ आणि भविष्यातील विकासाची भरपूर संधी आहे. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी हे शेअर्स चांगले परतावे देऊ शकतात. मोतीलाल ओसवालच्या अहवालानुसार, या तिन्ही कंपन्यांमधील शेअर्स १९ ते २८ टक्क्यांपर्यंत परतावा देण्याची क्षमता बाळगतात.
या यादीतील पहिला शेअर आहे – ‘वा टेक वाबैग’. पाणी व्यवस्थापन प्रकल्पांमध्ये काम करणारी ही कंपनी सध्या मोठ्या आणि फायदेशीर ऑर्डर्सवर लक्ष केंद्रित करत आहे. तिच्याकडे सुमारे १३,७०० कोटी रुपयांची ऑर्डर बुक आहे. याशिवाय २०,००० कोटी रुपयांपर्यंतच्या प्रकल्पांसाठी बिडिंग प्रक्रियाही सुरु आहे. २०२५ ते २०२८ दरम्यान महसूल आणि निव्वळ नफ्यात दरवर्षी सुमारे २० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे या शेअरचे मूल्यांकन आणखी सुधारण्याची शक्यता आहे. या शेअरचं लक्ष्य १,९०० रुपये इतकं दिलं आहे.
दुसरी कंपनी म्हणजे इंडियन हॉटेल्स. ही कंपनी टाटा समूहाची असून ‘ताज’ ब्रँडद्वारे देश-विदेशात आपली मजबूत ओळख निर्माण केली आहे. पर्यटन आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रामध्ये सध्या वेगाने वाढ होत असल्याने इंडियन हॉटेल्सला मोठा फायदा होत आहे. जून २०२५ मध्ये कंपनीने ३२ टक्क्यांची महसूलवाढ नोंदवली आहे. ब्रोकरेजच्या मते, कंपनीच्या नव्या उपक्रमांमुळे आणि वाढत्या व्यवसायामुळे तिचे उत्पन्न भविष्यातही भक्कम राहील. या शेअरचे लक्ष्य ९०० रुपये इतके ठेवण्यात आले आहे.
हे पण वाचा : स्वस्तात खरेदी करा ‘हा’ ऊर्जा क्षेत्रातील शेअर, 24% नफा मिळण्याची शक्यता!
तिसरा शेअर आहे टायटन कंपनीचा. राकेश झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओमधील ‘हिरा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कंपनीने दरवर्षी दमदार कामगिरी केली आहे. ‘तनिष्क’ या ब्रँडमुळे कंपनीचा ज्वेलरी व्यवसाय भारतात आघाडीवर आहे. शिवाय घड्याळे, आयवेअर आणि फॅशन क्षेत्रातही कंपनीने आपली मजबूत उपस्थिती निर्माण केली आहे. मार्च २०२५ अखेर टायटनकडे ३,३१२ स्टोअर्स होते, आणि नवे बाजारपेठांमध्ये विस्तार सुरु आहे. यामुळे कंपनीचे एकंदर उत्पन्न, नफा आणि व्यवसाय सातत्याने वाढत आहे. ब्रोकरेजनं यासाठी ४,२५० रुपयांचे लक्ष्य दिलं आहे.
