टाटा पॉवर शेअर ‘चार्ज’ होणार! रेलिगिअर ब्रोकिंगकडून जबरदस्त अंदाज
Tata Power Share Price
Tata Power Share Price : भारतीय शेअर बाजारात आजची सकाळ काहीशी निराशाजनक ठरली असली, तरी काही निवडक शेअर्सनी गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास टिकवून ठेवला आहे. टाटा समूहाची प्रमुख ऊर्जा क्षेत्रातील कंपनी ‘टाटा पॉवर’ याच यादीत पुन्हा एकदा झळकतेय. बाजारातील घसरण असतानाही, रेलिगेअर ब्रोकिंग या प्रतिष्ठित ब्रोकरेज संस्थेने ‘टाटा पॉवर’वर सकारात्मक मत नोंदवत आगामी काळात शेअरमधून दमदार परतावा मिळेल, असा अंदाज व्यक्त केला आहे.
हे पण वाचा : Zomato शेअरमध्ये सुवर्णसंधी! मिळू शकतो 45% परतावा, वाढीचा अंदाज आला समोर
आजच्या ट्रेडिंग सत्रात (18 जुलै 2025), टाटा पॉवरचा शेअर 411 रुपयांवर खुला झाला आणि दिवसभरात 414.15 रुपयांचा उच्चांक गाठत गुंतवणूकदारांच्या नजरा वेधून घेतल्या. मात्र, काहीसा दबाव जाणवत शेवटी तो 1.36% नी घसरून 407.9 रुपयांवर स्थिरावला. बाजाराच्या एकूण घसरणीकडे पाहता ही कामगिरी लक्षणीय ठरते.
रेलिगेअर ब्रोकिंगने आपल्या अलीकडील रिपोर्टमध्ये ‘टाटा पॉवर’साठी दमदार टार्गेट दिलं आहे. कंपनीचा शेअर 494.85 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकाच्या जवळ पोहोचू शकतो, असा त्यांचा अंदाज आहे. म्हणजेच, सध्याच्या पातळीवरून पाहता गुंतवणूकदारांना पुढील काही महिन्यांत 20% पर्यंत परतावा मिळू शकतो.
टाटा पॉवर कंपनी सध्या ग्रीन एनर्जी, इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर आणि सौरऊर्जा प्रकल्पांमध्ये भरीव गुंतवणूक करत आहे. यामुळे कंपनीच्या उत्पन्नात आणि प्रॉफिट मार्जिनमध्ये सातत्याने वाढ दिसून येत आहे. या विकास योजनांमुळेच अनेक विश्लेषक ‘टाटा पॉवर’ला लाँग टर्म पोर्टफोलियोसाठी उपयुक्त समजतात.
आज टाटा पॉवरचे मार्केट कॅप जवळपास 1.30 लाख कोटी रुपये इतके आहे. 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 326.35 रुपये असलेला हा शेअर, सध्या त्या तुलनेत चांगल्या पातळीवर ट्रेड होत आहे, जे गुंतवणुकीच्या दृष्टीने स्थैर्यदर्शक आहे.
हे पण वाचा : शेअर बाजारात खळबळ! निफ्टी २५०००च्या खाली, सेन्सेक्स ५०० अंकांनी कोसळला
शेअर बाजाराचा मूड सध्या काहीसा संमिश्र आहे. सेन्सेक्स 512 अंकांनी घसरून 81,746 वर आणि निफ्टी 142 अंकांनी घसरून 24,969 वर स्थिरावले आहेत. मात्र, अशा स्थितीतही टाटा पॉवरसारखा शेअर बाजारातील दबावाला तोंड देत आपलं मूल्य टिकवून ठेवतो, तेव्हा गुंतवणूकदारांना असा शेअर पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट करणे योग्य वाटू शकते.
