June 13, 2026

टाटा टेक शेअर्समध्ये तेजीचे वारे! तज्ज्ञांचा BUY सल्ला आणि नवा टार्गेट प्राईस

0
Tata Technologies Share Price

Tata Technologies Share Price

Tata Technologies Share Price : शेअर बाजारात सोमवारी काहीशी घसरण पाहायला मिळाली असतानाच टाटा टेक्नॉलॉजीजच्या शेअर्सने मात्र स्थैर्य राखत सौम्य वाढ नोंदवली. सध्या भारतीय शेअर बाजारात अनिश्चितता असली तरी टाटा टेकच्या कामगिरीने बाजारात सकारात्मक चर्चा सुरू केली आहे. कंपनीचे शेअर्स थोडक्याच वाढीसह वर जात असतानाच ब्रोकरेज तज्ज्ञांकडून या शेअरला ‘BUY’ म्हणजेच खरेदी करण्याचा सल्ला दिला गेला आहे.

हे पण वाचा : CDSL शेअर्समध्ये मोठी घसरण! कंपनीचा नफा कमी, पुढे काय होणार?

सोमवार, 28 जुलै 2025 रोजी टाटा टेक शेअरने 0.23 टक्क्यांची वाढ नोंदवली आणि तो 709.95 रुपयांवर ट्रेड करत होता. दिवसभरात शेअरने 714.90 रुपयांचा उच्चांक गाठला, तर नीचांकी 704.40 रुपये इतका खाली गेला. म्हणजेच, ट्रेडिंग सेशनमध्ये या शेअरची हालचाल मर्यादित राहिली असली तरी तज्ज्ञांचा या शेअरवरील विश्वास अजून कायम आहे.

विशेष म्हणजे, टाटा टेकचा हा शेअर एका काळी 1136 रुपयांपर्यंत पोहोचला होता. तर गेल्या ५२ आठवड्यांत त्याने नीचांकी 597 रुपयांचा स्तरही पाहिला आहे. सध्या कंपनीचे एकूण मार्केट कॅप 28,800 कोटी रुपयांवर असून, गुंतवणूकदार व विश्लेषकांचा कल या शेअरकडे पुन्हा वळताना दिसत आहे.

बाजारातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर टाटा टेकने दाखवलेली स्थैर्याची झलक महत्त्वाची मानली जात आहे. बीएसई सेन्सेक्स सोमवारी 137 अंकांनी घसरून 81325.32 वर बंद झाला, तर निफ्टी 23 अंकांनी खाली येऊन 24813.35 वर स्थिरावला. निफ्टी बँक आणि आयटी निर्देशांक सुद्धा घसरणीच्या क्षेत्रात राहिले. मात्र अशा काळात टाटा टेकचे शेअर्स हिरव्याकडे राहिले हे गुंतवणूकदारांसाठी दिलासा देणारे ठरते.

ब्रोकरेज फर्म्सच्या मते, टाटा टेकच्या आगामी तिमाहीतून चांगले निकाल अपेक्षित असून, कंपनीचा फोकस ऑटोमोटिव्ह व एअरस्पेस क्षेत्रात वाढत असल्यामुळे त्याचे लाभ भविष्यात दिसून येतील. अनेक ब्रोकिंग हाउसेसने यासाठी ₹760 ते ₹800 पर्यंतचे टार्गेट प्राइस जाहीर केले आहेत. त्यामुळे सध्याच्या भावात खरेदी केल्यास लघु ते मध्यम कालावधीत फायदा होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

हे पण वाचा : रिलायन्स पॉवर शेअर्सवर मोठा धक्का! ब्रोकिंग फर्मचा SELL सल्ला, भाव घसरणार?

तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास, सध्या जे गुंतवणूकदार दीर्घकालीन रणनीती शोधत आहेत त्यांच्यासाठी टाटा टेक हा शेअर एक चांगला पर्याय ठरू शकतो. मात्र, कोणतीही गुंतवणूक करताना स्वतःचे संशोधन करणे आणि बाजारातील घडामोडी लक्षात घेणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Discover more from Punelive24

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading