‘हा’ पॉवर शेअर देणार दमदार रिटर्न! तज्ज्ञांनी दिले खरेदीचे संकेत आणि टार्गेट
JP Power Share Price
JP Power Share Price : शेअर बाजारात आज सकाळपासून सौम्य घसरण झाली असली तरी काही निवडक शेअर्स गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेत आहेत. त्यातच जयप्रकाश पॉवर वेंचर्स लिमिटेडचा स्टॉकही चर्चेचा विषय ठरत आहे. केवळ २३ रुपयांच्या आसपास ट्रेड होणाऱ्या या शेअरने गेल्या काही आठवड्यांत स्थिरतेचा प्रत्यय दिला असून, तज्ज्ञांनी या शेअरकडे गंभीरपणे पाहण्याचा सल्ला दिला आहे.
हे पण वाचा : फक्त 15 रुपयांचा हा शेअर तुम्हाला करणार मालामाल, मिळणार 24% जबरदस्त परतावा!
आज गुरुवारी बाजार उघडताच जयप्रकाश पॉवरचा शेअर २३.७५ रुपयांवर सुरू झाला आणि काही वेळातच २३.९४ रुपयांपर्यंत पोहोचला. मात्र त्यानंतर थोडीशी घसरण होत शेअर सध्या २३.४४ रुपयांवर व्यवहार करत आहे. याचा दिवसातील नीचांक २३.३० रुपये असून, याच रेंजमध्ये व्यवहार सुरू आहे.
विशेष म्हणजे गेल्या ५२ आठवड्यांतील या स्टॉकचा उच्चांक २७.७ रुपये आणि नीचांक १२.३६ रुपये आहे. त्यामुळे सध्याची किंमत पाहता गुंतवणूकदारांना ‘डिस्काउंटमध्ये’ खरेदीची संधी मिळू शकते, असं जाणकारांचं मत आहे. कंपनीचे सध्याचे मार्केट कॅप जवळपास १६ हजार कोटींच्या घरात आहे, जे स्मॉलकॅप श्रेणीत असूनही लक्षवेधी आहे.
गुंतवणूक सल्लागारांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीच्या आगामी प्रकल्पांमुळे तिचा महसूल वाढण्याची शक्यता आहे. देशातील वाढती वीज मागणी, ग्रीन एनर्जीमधील हालचाली आणि नव्याने जाहीर होणारी सरकारी धोरणं पॉवर कंपन्यांसाठी सकारात्मक संकेत देत आहेत. या पार्श्वभूमीवर जयप्रकाश पॉवर वेंचर्सचा शेअर २५-२८ रुपयांपर्यंत जाऊ शकतो, असा अंदाज काही ब्रोकरेज संस्थांनी व्यक्त केला आहे.
कंपनीच्या सध्याच्या आर्थिक स्थितीचा विचार करता, तिचे कर्ज प्रमाण पूर्वीच्या तुलनेत थोडेसे कमी झाले आहे. काही वर्षांपूर्वी अडचणीत सापडलेली ही कंपनी आता आपली कार्यक्षमता वाढवण्याच्या मार्गावर आहे. थर्मल पॉवरसोबतच हायड्रो प्रोजेक्ट्समध्येही कंपनीची गुंतवणूक आहे, जे दीर्घकालीन दृष्टिकोनातून फायदेशीर ठरू शकतात.
