June 15, 2026

पावसाबाबत मोठी अपडेट! ‘या’ जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि पावसाची शक्यता, पाहा तुमचा जिल्हा यात आहे का?

0
Maharashtra Rain Alert

Maharashtra Rain Alert

Maharashtra Rain Alert : राज्यात सध्या पावसाने थोडी उसंत घेतलेली असली तरी हवामान खात्याच्या अंदाजानुसार, १७ जुलै २०२५ रोजी मराठवाडा आणि विदर्भातील १४ जिल्ह्यांमध्ये विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मागील काही दिवसांत पावसाचा जोर कमी झाल्याने अनेक भागांत उकाड्याने हैराण केले होते. विशेषतः विदर्भात पारा पुन्हा ३५ अंश सेल्सिअसच्या वर गेला असून, अनेक जिल्ह्यांत उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, आज पुन्हा एकदा हवामानात बदल होण्याची चिन्हं आहेत.

हे पण वाचा : सोनं खरेदी करणार आहात? थांबा! आजचा दर पाहून तुम्हीही थक्क व्हाल

सध्या देशाच्या पूर्व भागात — बिहार, उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या काही भागात — कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. त्याचबरोबर समुद्रसपाटीपासून सुमारे ५.८ किमी उंचीवर चक्राकार वाऱ्यांचा प्रभाव दिसून येत आहे. यामुळे राजस्थानपासून ते बंगालच्या उपसागरापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला असून, याचा परिणाम महाराष्ट्रावरही दिसू लागला आहे. त्यामुळे हवामान खात्याने आज मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड तसेच विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया, नागपूर, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

गेल्या २४ तासांत राज्याच्या घाटमाथा व कोकण भागात मात्र पावसाचा जोर कायम होता. ताम्हिणी आणि रोहा या दोन ठिकाणी २१० मिमी इतक्या उच्चांकी पावसाची नोंद झाली. मात्र दुसरीकडे, विदर्भामध्ये मात्र उकाडा अधिक जाणवला. ब्रह्मपुरी येथे ३५.९ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदले गेले, जे राज्यातील सर्वाधिक होते.

हे पण वाचा : आज १७ जुलैचं राशीभविष्य: कोणाच्या नशिबात धनलाभ, कोणाला कोर्टातून दिलासा? वाचा सविस्तर

या बदलत्या हवामानामुळे शेतकरी वर्गाला सतर्क राहावे लागणार आहे. सध्या खरीप हंगामाचे काम जोमात सुरू असून, काही ठिकाणी पेरणीही पूर्ण झाली आहे. अशा वेळी वीज कोसळण्याचा धोका असल्याने शेतकऱ्यांनी उघड्यावर काम करताना काळजी घ्यावी. तसेच, सार्वजनिक वीजपुरवठा यंत्रणांनीही योग्य खबरदारी घ्यावी, अशी विनंती प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Discover more from Punelive24

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading