October 31, 2026

आज शेअर बाजार सुरुवातीलाच घसरला! मेटल कमकुवत – IT, HDFC, Infosys मध्ये उसळी

0
Sensex Today

Sensex Today

Sensex Today : भारतीय शेअर बाजारात मंगळवारच्या सत्राला सौम्य घसरणीने सुरुवात झाली असून गुंतवणूकदारांच्या मनात सतत बदलणाऱ्या जागतिक संकेतांमुळे अनिश्चितता दिसून येते आहे. बीएसई सेन्सेक्स ३६ अंकांच्या घसरणीसह ८२,५३४ वर उघडला, तर निफ्टी अवघ्या १ अंकाच्या वाढीसह २५,१९६ वर स्थिरावला. मात्र, बँक निफ्टीने १०५ अंकांची उसळी घेत ५७,१११ चा टप्पा गाठत बाजारात सकारात्मकतेचे संकेत दिले.

आजच्या सत्रात मेटल क्षेत्र सर्वाधिक दबावात दिसून आले. आंतरराष्ट्रीय बाजारात किमतीत झालेली नरमाई आणि चीनकडून मागणीत घट होण्याच्या शक्यतेचा या क्षेत्रावर परिणाम झाल्याचे दिसते. याउलट, IT आणि बँकिंग क्षेत्रातील काही निवडक शेअर्समध्ये तेजीची नोंद झाली.

हे पण वाचा : वेदांता लिमिटेड शेअर पुन्हा रडारवर! तज्ज्ञांचा अलर्ट – 35% नफ्याची संधी

आजच्या व्यवहारात HDFC बँक, Infosys, टेक महिंद्रा, अदानी पोर्ट्स आणि ट्रेंट या कंपन्यांचे शेअर्स वाढीच्या मार्गावर होते. विशेषतः Infosys आणि टेक महिंद्राने आयटी क्षेत्रात सकारात्मक वातावरण निर्माण केले आहे. निफ्टी IT निर्देशांकात ०.३५ टक्क्यांची वाढ झाली आहे.

दुसरीकडे, टाटा मोटर्स, बजाज फायनान्स, ICICI बँक आणि महिंद्रा या शेअर्समध्ये घसरण झाली. महागाईचा दबाव आणि आगामी तिमाहीत येणारे उत्पन्नविषयक अंदाज यामुळे काही गुंतवणूकदारांनी नफा वसुलीचा मार्ग स्वीकारल्याचं दिसत आहे.

भारतीय रुपया आज १७ पैशांनी कमजोर होऊन ८५.९८ प्रति डॉलर्सवर उघडला. डॉलरच्या तुलनेत रुपयात होत असलेली घसरण ही भारतात वाढत असलेल्या आयात खर्चासाठी चिंतेची बाब ठरत आहे. फार्मा क्षेत्रामध्येही सौम्य घसरण दिसली असून, डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या निवडणूक वक्तव्याचा या क्षेत्रावर परिणाम झाल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

हे पण वाचा : टाटा स्टील शेअरवर विदेशी संस्थांचं लक्ष! BUY रेटिंगसोबत टार्गेट प्राईस जाहीर

मंगळवारी अमेरिकन बाजारांमध्ये संमिश्र वातावरण होते. तंत्रज्ञानप्रधान NASDAQ आणि S&P 500 यांनी विक्रमी उच्चांक गाठला, तर Dow Jones मात्र घसरणीसह बंद झाला. अमेरिकेतील महागाईदर वाढल्याने व्याजदरांबाबत गुंतवणूकदारांमध्ये पुन्हा एकदा चिंतेचं वातावरण आहे. या घडामोडींचा अप्रत्यक्ष परिणाम भारतीय बाजारावरही होताना दिसतो आहे.

 

Leave a Reply