November 2, 2026

वेदांता लिमिटेड शेअर पुन्हा रडारवर! तज्ज्ञांचा अलर्ट – 35% नफ्याची संधी

0
Vedanta Share Price

Vedanta Share Price

Vedanta Share Price : भारतीय शेअर बाजारात आज, मंगळवार १५ जुलै २०२५ रोजी उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. सेन्सेक्स आणि निफ्टी या प्रमुख निर्देशांकांनी पुन्हा एकदा मजबूत उसळी घेतली असून गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मकता दिसून आली. विशेषतः खनिज आणि नैसर्गिक संसाधन क्षेत्रातील ‘वेदांता लिमिटेड’ या स्टॉकने बाजारात विशेष लक्ष वेधलं आहे.

हे पण वाचा : टाटा स्टील शेअरवर विदेशी संस्थांचं लक्ष! BUY रेटिंगसोबत टार्गेट प्राईस जाहीर

दलाल स्ट्रीटवरील बाजार विश्लेषकांनी वेदांता लिमिटेडच्या स्टॉकसंदर्भात गुंतवणूकदारांना ‘BUY’ सल्ला दिला आहे. त्यांच्या मते, या शेअरमध्ये पुढील काही महिन्यांत ३५% पर्यंतचा आकर्षक परतावा मिळू शकतो. सध्या वेदांता शेअर ४४९.०५ रुपयांवर ट्रेड करत असून दिवसभरात ४५१.२५ रुपयांचा उच्चांक गाठल्याचं पाहायला मिळालं.

आज सकाळी ट्रेडिंगला सुरुवात होताच बीएसई सेन्सेक्स तब्बल ३८२ अंकांनी वधारून ८२,६३६ वर पोहोचला, तर निफ्टीनेही १२९ अंकांची उसळी घेत २५,२१२ चा टप्पा पार केला. याच दरम्यान, वेदांता स्टॉकने सकारात्मक हालचाल दाखवत गुंतवणूकदारांना उत्साहित केलं. कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ५२६.९५ रुपये असून सध्याचा दर त्याच्या तुलनेत अद्यापही खाली आहे, ज्यामुळे आणखी वाढीची शक्यता निर्माण झाली आहे.

खनिज उत्खनन, धातू, ऊर्जा आणि तेल-गॅस क्षेत्रात कार्यरत असलेल्या वेदांता ग्रुपची बाजारातील पकड भक्कम आहे. सध्या कंपनीचे मार्केट कॅप १.७५ लाख कोटी रुपयांच्या घरात आहे. गेल्या काही महिन्यांत कंपनीच्या व्यवसाय धोरणात आणि व्यवस्थापनात मोठे बदल झाले असून, त्याचा सकारात्मक परिणाम स्टॉकच्या कामगिरीवर दिसून येतोय.

विशेषतः जागतिक स्तरावर मेटल्स आणि खनिजांमध्ये वाढती मागणी, तसेच भारतातील औद्योगिक क्षेत्राची झपाट्याने होणारी प्रगती, या दोन्ही बाबी वेदांतासारख्या कंपन्यांसाठी संधीची वेळ आहे. यामुळेच बाजारातील अनेक नामवंत विश्लेषकांनी वेदांता स्टॉक ‘खरेदी’साठी योग्य असल्याचे मत व्यक्त केले आहे.

हे पण वाचा : फक्त ₹15 मध्ये हा पेनी स्टॉक! 17% रिटर्नची संधी, तज्ञांचं लक्ष ‘या’ शेअरवर

सध्याचा दर पाहता, वेदांता शेअर अजूनही तुलनेने स्वस्त मानला जात आहे. ५२ आठवड्यांच्या नीचांकी स्तरापासून (३६३ रुपये) तो आता बऱ्यापैकी सावरला असला तरी अजूनही त्यात दमदार वाढीची क्षमता असल्याचं मत नोंदवलं जात आहे.

 

Leave a Reply